Type Here to Get Search Results !

Alandi अलंकापुरी अखंड हरिनाम सोहळ्यात उद्या बहुरूपी भारूड

शनिवारी आळंदीत भव्य रथोत्सव - दिपोत्सवाचे आयोजन 

ज्ञानेश्वरी पारायणास वाचकांचा प्रतिसाद ; कीर्तन, प्रवचन, चिंतन कथा भाविकांचा प्रतिसाद 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थ आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. रामचंद्र देखणे साहित्य, कला प्रतिष्ठान प्रस्तुत बहुरूपी भारुड या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी ( दि. ८ ) करण्यात आले आहे. संध्याकाळी साडे आठ ते दहा या वेळात ग्रामदैवत भैरवनाथ महाराज ट्रस्ट प्रांगणात हा वारकरी संप्रदायातील लक्षवेधी बहुरूपी भारूडाचा कार्यक्रम होत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे हा कार्यक्रम सादर करीत आहेत. 

  यात अभिनेते श्री स्वामी महाराज मठातील क्षेत्रोपाध्ये अवधूत गांधी, अभय नलगे यांच्यासह ३५ कलाकार बहुरूपी भारुड सादर करून भाविकांना बहुरूपी भारुड पाहण्याची संधी देत आहेत. या पर्वणीस भाविक, वारकरी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रोज सुमारे २५ हजारावर भाविकांना अन्नदान महाप्रसाद सेवा लक्षवेधी 




  आळंदी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सलग सहा दिवस आमदार शंकरराव जगताप, उद्योजक विजयशेठ जगताप यांचे परिवार तर्फे भाविकांना अन्नदान महाप्रसाद सेवा रुजू होत आहे.   हजारो भाविकांना अगदी वेळेवर चहा, नाष्टा, दोन वेळचे मिष्टान्न जेवण महाप्रसाद सेवा अगदी मुक्तहस्त सेवा रुजू झाली आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता पडू न देता आळंदीचे वैभवात वाढ करणारी महाप्रसाद, अन्नदान सेवा जगताप परिवार तर्फे दिली जात आहे. भाविक, नागरिक यांनी या सेवेचे समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पिंपळे गुरव येथील रामेश्वर महाराज यांचे नियंत्रणात २०० महिला पुरुष सेवारत कर्मचारी यांचे सेवारत हातून सेवा देत आहेत. ही सेवा देण्याची संधी आमदार शंकरराव जगताप यांच्यामुळे मिळाल्याचे रामेश्वर महाराज यांनी सांगितले. भाविक ही मोठ्या भक्तिमय वातावरण अन्नदान महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. सुमारे २५ हजारावर भाविकांना रोज अन्नदान महाप्रसाद वाटप केले जात आहे. यासाठी आळंदी ग्रामस्थ देखील भाविकांनी वेळेत महाप्रसाद मिळेल याची दक्षता घेत सर्वांपर्यंत महाप्रसाद वाटप करीत आहेत. आळंदी ग्रामस्थांचे वतीने पहिल्या दिवसाची आणि काल्याचे महाप्रसादाची शनिवारी ( दि. १० ) व्यवस्था असून अन्नदान सेवा भक्तिमय वातावरणात रुजू केली जात आहे.  

आळंदीत शुक्रवारी भव्य रथोत्सव - दिपोत्सव 

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदीत शुक्रवारी ( दि. ९ ) सायंकाळी पाच ते साडे आठ या वेळात श्रींचा भव्य रथोत्सव आणि इंद्रायणी तिरी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. यात इंद्रायणी पूजन, इंद्रायणी आरती होणार आहे. ७५० मृदंग वादक, २१०० टाळकरी यांचे वादन होणार आहे. इंद्रायणी नदीचे दुतर्फा या निमित्त विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. यावेळी इंद्रायणी पूजन, आरती आणि १५१ वेदमूर्तींचे वेदमंत्रजय घोषात मंगलमय वातावरणात दिपोत्सव सोहळा होत आहे. या दीपोत्सवात ७५०० महिला भाविक इंद्रायणीचे नदीपात्रात प्रज्वलित केलेले दिवे समर्पित करणार आहेत. या भव्य दिव्य सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिक, भाविक, वारकरी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आळंदी अखंड हरिनाम सप्ताहात बुधवारी ( दि. ७ ) सकाळी सहा वाजता एकनाथ महाराज कोष्टी यांचे नेतृत्वात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील पाचव्या दिवशीची पारायण सेवा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. दुपारी दिड वाजता चैतन्य महाराज देगलूरकर यांची सुश्राव्य वाणीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र चिंतनातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानेश्वर महाराज जाधव आणि केशव महाराज उखळीकर यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी सुश्राव्य प्रवचन सेवा हरिनाम गजरात झाली. रात्री संगीत भजन सेवेत तमिळनाडू येथील माऊली भक्त विठ्ठलदास महाराज गोविंदपुरम यांची भजन सेवा होत आहे.


Post a Comment

0 Comments