हरिनाम गजरात अन्नदान सेवा लक्षणीय ; महाप्रसाद सेवा अगदी मुक्तहस्त
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीत सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सलग सहा दिवस आमदार शंकरराव जगताप, उद्योजक विजयशेठ जगताप यांचे परिवार तर्फे भाविकांना अन्नदान महाप्रसाद सेवा रुजू होत आहे. बुधवारी ( दि. ७ ) सुमारे ४५ हजारावर भाविकांना महाप्रसाद सेवा रुजू झाली. याशिवाय पारायण सोहळ्यात वेळेवर चहा, नाष्टा आणि सकाळचे तसेच संध्याकाळ दोन वेळचे मिष्टान्न जेवण महाप्रसाद सेवा अगदी मुक्तहस्त सेवा रुजू झाली आहे.
कोणत्याही प्रकारची कमतरता पडू न देता आळंदीचे वैभवात वाढ करणारी महाप्रसाद, अन्नदान सेवा जगताप परिवार तर्फे दिली जात आहे. भाविक, नागरिक यांनी या सेवेचे समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पिंपळे गुरव येथील रामेश्वर महाराज यांचे नियंत्रणात २०० महिला पुरुष सेवारत कर्मचारी यांचे सेवारत हातून महाप्रसाद अन्नदान सेवा देत आहेत. ही सेवा देण्याची संधी आमदार शंकरराव जगताप यांच्यामुळे मिळाल्याचे रामेश्वर महाराज यांनी सांगितले. भाविक ही मोठ्या भक्तिमय वातावरण अन्नदान महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
सुमारे ४५ हजारावर भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप गुरुवारी पहिल्या सत्रात झाले. यासाठी आळंदी ग्रामस्थ देखील भाविकांनी वेळेत महाप्रसाद मिळेल याची दक्षता घेत सर्वांपर्यंत महाप्रसाद वाटप करीत आहेत. आळंदी ग्रामस्थांचे वतीने पहिल्या दिवसाची आणि काल्याचे महाप्रसादाची शनिवारी ( दि. १० ) व्यवस्था असून अन्नदान सेवा भक्तिमय वातावरणात रुजू केली जात आहे. अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानदान आणि अन्नदान मोठ्या भक्तिमय वातावरणात होत आहे. भाविकांची लक्षणीय उपस्थितीने श्रींचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित सप्ताह नियोजन प्रभावी झाले असल्याचे प्रतिक्रिया भाविकांतून मिळत आहेत.



.jpg)
Post a Comment
0 Comments