Type Here to Get Search Results !

Alandi श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला ३१ लाख रुपयांची देणगी

अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थान तर्फे विशेष आभार 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे विमाननगर येथील अभय भुतडा फाउंडेशन यांचे वतीने माऊली भक्त अभयजी भुतडा (CA) यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे ३ ते १० मे या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त होत असलेल्या पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवास ३१ लाख रुपयांची भरीव देणगी सुपूर्द करण्यात आली. 

  अभय भुतडा फाउंडेशन तर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी कडे भरघोस ३१ लाख रुपयांची रक्कम देवस्थानचे खात्यात आरटीजीएस द्वारे देण्यात आली. माऊली भक्त अभयजी भुतडा यांना देणगी रक्कमेची पावती व उत्सव कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आहे. 

    श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे सेवक बाळू मुंगसे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे खजिनदार विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील, हनुमान जी, यांनी अभय भुतडा यांची भेट घेऊन त्यांना श्री माऊलींची प्रतिमा व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिला. सोहळ्याचे निमंत्रण देऊन आळंदी भेट देण्यास सांगितले. तत्पूर्वी अभय भुतडा यांनी आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, मुख्य व्यवस्थापक  माऊली वीर यांचे समवेत संवाद साधून चर्चा केली.  श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी अभय भुतडा यांचे समिती तर्फे आभार व्यक्त केले.     


Post a Comment

0 Comments