Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी

श्रींचे गाभाऱ्यात पुष्पसजावट ; दर्शनास गर्दी - इंद्रायणी आरती उत्साहात   

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेने पवमान अभिषेख, नित्यउपचार पूजाविधा, महानैवेद्य, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रमानी एकादशी आळंदी मंदिरात साजरी करण्यात आली. मोहिनी एकादशीचा दुर्मिळ योग भाविकांना लाभला. मोहिनी एकादशीचे उपवासाचा परिणाम जवळ जवळ संपूर्ण जीवनात एकादशी केल्याच फळ प्राप्त होते. अशी भावना वारकरी संप्रदायात असल्याने या एकादशीला खूप महत्त्व आहे. आळंदी मंदिरात श्रींचा गाभारा आकर्षक पुष्पसजावटीने सजविण्यात आला होता. आळंदी देवस्थानने भाविकांना पिण्याचे पाणी, फराळ वाटप, कमी वेळात भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. इंद्रायणी आरती समितीचे वतीने आरती उत्साहात झाली.     

  मोहिनी एकादशी पर्वकाळ गुरुवारी ( दि ८ ) एकादशी केल्यास आयुष्यभर एकादशी केलेचे पुण्य अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मोहिनी एकादशी आळंदी, देहु पंचक्रोशीत धार्मिक महत्त्व ओळखून साजरी झाली. या एकादशीला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे. त्याच प्रमाणे हरिनाम गजरात एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्त प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक माऊली वीर, सेवक कर्मचारी यांनी नियोजन केले. मंदिरातील श्रींचा गाभारा लक्षवेधी फुलांनी सजविण्यात आला होता. आळंदीत एकादशी दिनी अन्नदान फराळाचे वाटप उत्साहात करण्यात आले. आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले असून इंद्रायणी घाटावर कर्मचारी यांनी विशेष स्वच्छता आणि नदीचे घाट दुतर्फ़ा पाण्याने स्वच्छ केले. 

आळंदीत इंद्रायणी आरती हरिनाम जयघोषात  

  तीर्थक्षेत्र आळंदी जनहित फाउंडेशन, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट  स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. मोहिनी एकादशी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीची आरती जनजागृती करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी संयोजिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिताताई झुजम, माजी नगरसेविका मालनताई घुंडरे, उषाताई नरके, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर,रोहिदास कदम, अनिता शिंदे, मानसी सोळंके, शैला तापकीर, नीलम कुरधोंडकर, लता वर्तले, मंगलाताई जाधव, सुनंदा चव्हाण, तारा सरवदे, संगीत महामुनी, शिळा कुलकर्णी, राधाताई घुंडरे आदींसह भाविक उपस्थित होते. यावेळी इंद्रायणीच्या आरती, पसायदान हरिनाम जयघोषात झाले. 

  इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.  

Post a Comment

0 Comments