Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत महायुती घटक पक्षांचे वतीने मुख्यमंत्र्याचें बेताल वक्तव्याचा निषेध

 आळंदीत महायुती घटक पक्षांचे वतीने मुख्यमंत्र्याचें बेताल वक्तव्याचा निषेध 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे संवादात चांगले नाहीत असे परखड वक्तव्य केल्याने सत्ताधारी युतीतील घटक मित्र पक्ष नाराजी व्यक्त करीत आहेत. याचाच भाग म्हंणून आळंदी शहर शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या भाजपच्या आघाडीतील घटक मित्र पक्ष असलेल्या आळंदी शहर पक्ष संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. 

 आळंदी येथील महाद्वार प्रांगणात आळंदी शहर शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) आणि आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या पक्ष संघटनेच्या वतीने जाहीर निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यमंत्री यांनी बुधवारी एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात संवादाचे बाबतीत विचारणा झालेल्या प्रश्नास उत्तर देताना जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचे निषेधार्थ आळंदीत मुख्यमंत्री यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री यांनी जे बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्याचा यावेळी पक्ष संघटनेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जाहीर निषेध करीत अशी बेताल वक्तव्य टाळण्याचे आवाहन केले. 

  या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले पाटील, सौरभ गव्हाणे, शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, विभाग प्रमुख राहुल थोरवे, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, शाखा प्रमुख रोहिदास कदम, दिनकर तांबे, शंकरराव घेनंद, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील, विनायक महामुनी, निसार सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस खेड प्रवक्ते आरिफ शेख,सायरा शेख आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. विविध पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त करीत वक्तव्याचा जाहीर निषेध केला. महायुती सरकार राज्यात असल्याने घटक पक्षांना बरोबर घेऊन न्याय्य वागणूक मिळणे अपेक्षित असून यापुढील काळात अशी वक्तव्य टाळावीत असेही आवाहन पदाधिकारी यांनी मनोगतातून व्यक्त केले. संयोजन सौरभ गव्हाणे, राहुल चव्हाण, मृदुल भोसले पाटील आदींनी केले. पसायदानाने सांगता झाली. 

Post a Comment

0 Comments