अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याची जल्लोषात घोड्यांचे बग्गीतून मिरवणूक
आळंदीत विविध कार्यक्रमांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आळंदीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध उपक्रमात गुणवंत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शालेय मुलांचे उपस्थितीत करण्यात आला. आळंदीत विविध सेवाभावी व्यक्ती, संस्था, आळंदी ग्रामस्थ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विका प्रतिष्ठान यांचे वतीने ३०० व्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियान, घोड्यांचे बग्गीतून लक्षवेधी विद्युत रोषणाईने सजलेली बग्गी मधून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याची वैभवी मिरवणुक यळकोट यळकोट जय मल्हार चे जयघोषात, फटाक्यांची आतिषबाजी, लक्षवेधी लेझर शो, विद्युत रोषणाई, युवक तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक धार्मिक परंपरांचे पालन करीत झाली. मिरवणुकीचे स्वागत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मिरवणुकी दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या प्रसंगी आळंदी पोलिस स्टेशन तर्फे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमा नरके यांनी मिरवणुकीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजयजी घुंडरे पाटील, शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील, शाखा प्रमुख रोहिदास कदम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, मंडूबाबा पालवे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते. हजेरी मारुती आरती ग्रुपचे वतीने अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. समाज बांधव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा आळंदी मंडळाचे वतीने आयोजित कार्यक्रमास आळंदी मंडळ अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजपचे ध्यात्मिक आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक संजय घुंडरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन उत्साहात करण्यात आले होते. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, रामदास भोसले पाटील, माजी नगरसेवक दिनेश घुले, ज्ञानेश्वर रायकर, रुक्मिणी ताई कांबळे, सचिन काळे, भारतीय जनता पार्टीचे सुदाम उकिरडे, मंडल सरचिटणीस आकाश जोशी, संकेत वाघमारे, भागवत काटकर, वासुदेव तुर्की, शंतनू पोफळे, शुभम दुर्वे, अभिषेक उमरगेकर, विशाल भागवत, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मंगला हुंडारे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, समाज बांधव समाजाचे युवा कार्यकर्ते कार्यक्रमा निमित्त उपस्थित होते. आळंदी नगरपरिषद सभागृहात शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments