Type Here to Get Search Results !

Alandi कोयाळीत पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर स्मारक परिसरात स्वच्छता अभियान 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री क्षेत्र कोयाळी या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या निमित्त राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची साफसफाई स्वछता अभियान राबवित करण्यात आली. यावेळी स्मारकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचेपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यातून सर्व आदर्श घेऊन भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे. पुढील काळात ऐहिक प्रभावी कार्य करीत राहील. असे प्रतिपादन आळंदी ग्रामीण मंडळ खेड तालुका अध्यक्ष अमोल विरकर यांनी केले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य डॉ. रामशेठ गावडे पाटील, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकूर, माजी सभापती कल्पना पाटिलबुवा गवारी, बापूसाहेब थिटे, माजी सरपंच वासुदेव मुंगसे, राहुल घोलप, संतोष ठाणगे, राजू भांडवलकर, देविदास बवले, सुरेश लोखंडे, गहिनीनाथ लोखंडे, राजाराम लोखंडे, संभाजी घेनंद, संदीप शिंदे यांचेसह दिघे, व कोयाळी गावातील मान्यवर उपस्थित होते. राहुल घोलप यांनी प्रास्ताविक केले. सरपंच कोळेकर यांनी आभार मानले. आळंदी ग्रामीण भाजप मंडळाचे तालुका अध्यक्ष पदी युवा नेते अमोल वीरकर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे परिसरातून स्वागत करण्यात आले. विविध पदाधिकारी यांनी वीरकर यांचे कार्याचे स्वागत आणि निवडी निमित्त हार्दिक अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments