Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत दिंड्यांची वाहने - अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद

१७ जून पासून कारवाईस प्रारंभ ; माऊलींचे पालखी सोहळा प्रस्थान तयारीस वेग   

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी रात्री उशिरा प्रस्थान होणार असल्याने प्रस्थान सोहळा नियोजन पूर्व आढावा, तयारी, उपाय योजना अंतर्गत पोलीस प्रशासनाने तयारीचा आढावा घेत नियोजन जाहीर केले आहे. यात आळंदी पंचक्रोशी परिसरातील सुरळीत आणि सुरक्षित रहदारी, वाहतूक नियोजना अंतर्गत १७ जून पासून आळंदीत अवजड वाहनासह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र यातून पालखी सोहळ्याचे संदर्भातील वारकरी, भाविक, दिंडीकरी यांची तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहेत. इतर वाहनांनी पालखी सोहळ्याचे काळात आळंदी मार्गे न जात पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. 

   आळंदी माऊली मंदिरातील विना मंडपातून श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्या नांतर पहिला मुक्काम राम वाड्यासह गांधी वाड्यातील जागेत विकसित करण्यात आलेल्या दर्शनबारी सह आजोळघरी होणार आहे. २० जूनला भल्या पहाटे श्रींचे पालखीचा सोहळा हरिनाम गजरात पुण्या कडे मार्गस्थ होणार आहे. सोहळ्याचे काळात आळंदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. भाविक वारकरी आणि नागरिकांना वाहनांचे रहदारीच्या गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे वाहतुकीचे नियोजन जाहीर केले असून वाहन चालकांनी थेट आळंदी मार्गे प्रवास न करता पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केले आहे. १७ जून ते १९ जून या कालावधीत तीर्थक्षेत्राला आळंदीत वाहनांचे प्रवेशव्दार बंदी जाहीर करण्यात आली आहे. केवळ पास धारक, सोहळ्यातील आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने आळंदीत येतील याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, आळंदी दिघी  वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापरकरण्याचे आवाहन केले आहे.  

यामध्ये जड, अवजड वाहनांस प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. 

१ ) प्रवेश बंदी मार्ग:- चाकण ते आळंदी(आळंदी फाटा चाकण), २ ) चिंबळी ते आळंदी ( चिंबळी फाटा,चाकण ), पर्यायी मार्ग:- आळंदी फाटा – चिंबळी फाटा चाकण येथून – भारत माता चौक – पांजरपोळ चौक - अलंकापुरम चौक, ३ ) वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- शेलपिंपळगाव, वडगाव घेनंद ते आळंदी ( कोयाळी कमान ), पर्यायी मार्ग:- शेलपिंपळगाव – वडगांव घेनंद – कोयाळी कमान – कोयाळी – मरकळ, ४ ) वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- मरकळ ते आळंदी ( धानोरी फाटा )

पर्यायी मार्ग:- मरकळ – धानोरे फाटा – च-होली फाटा – मॅगझीन चौक / अलंकापुरम ५ ) वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- १ ) भारत माता चौक ते आळंदी ( भारत माता चौक, मोशी ).पर्यायी मार्ग:- भारत माता चौक – मोशी चौक – पांजरपोळ चौक – अलंकापुरम चौक २ ) मोशी – चाकण – शिक्रापूर ६ ) वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- विश्रांतवाडी ते आळंदी ( दिघी मॅगझीन चौक ). पर्यायी मार्ग:- १ ) पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी – मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – च- होली फाटा – मरकळ

२) पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी –  मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – पांजरपोळ चौक. 

    आळंदीत येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असून च- होली फाटा चौक, डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक / बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड, धानोरे फाटा / पीसीएस चौक  या ठिकाणाहून आळंदी कडे येणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. हवलदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून पुढे देहुफाटा  येथून आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी लागू रहाणार आहे. 

एकेरी मार्ग मध्ये  १ ) हवलदार वस्ती – तळेकर पाटील चौकातून उजवीकडे वळून आदित्य इंटरनॅशनल स्कूल – डुडुळगाव असा एकेरी मार्ग होणार असून डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदी पुलावरून चाकण मार्गे इच्छित स्थळी / डुडुळगाव चौकातून तळेकर पाटील चौक मार्गे हवालदार वस्ती ते मोशी चौक मार्गे इच्छित स्थळी, २ ) भारतमाता चौक ते हवालदार वस्ती वाय जंक्शन ते उजवीकडे वळून मोशी हा मार्ग एकेरी करण्यात येत आहे. मोशी चौका कडून हवालदार वस्ती कडून भारत माता चौक येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचे प्रवेशावर मनाई राहणार आहे. 

 आळंदीतून श्रींचा पालखी सोहळा २० जून ला पुण्याकडे मार्गस्थ होत असताना पालखी मार्गावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. यात विश्रांतवाडी – बोपखेल – आळंदी ,मरकळ – च -होली ते आळंदी ,मोशी चौक तसेच भारतमाता चौक ते हवालदार वस्ती मार्गे देहुफाटा आळंदी – आळंदी फाटा चाकण ते आळंदी, चिंबळी फाटा ते आळंदी, वडगाव घेनंद ते विश्रांत वड मार्गे आळंदी – पांजरपोळ चौक ते अलंकारपुरम चौक मार्गे आळंदी, मॅगझिन चौक,दिघी,बोपखेल, इ.ठिकाणी पालखी मार्गाला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या सर्व प्रकारांच्या वाहनांचे प्रवेशावर मनाई करण्यात आली आहे. 

  तीर्थक्षेत्र आळंदीत काही ठिकाणी  वाहने पार्किंची व्यवस्था करण्यात आली आहे. या मध्ये १ ) आळंदी – देहू रोड – तळेकर पाटील चौक ( दक्षिणेस ) ३ एकर, २ )आळंदी – देहू रोड तळेकर पाटील चौक ( उत्तरेस ) १ एकर,  ३ ) ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव जकात नाका जवळ – १० गुंठे, ४ ) बापदेव चौक – ४.५ एकर, ५ ) इंद्रायणी हॉस्पिटल समोर ( चाकण रोड ) ९ एकर, ६ ) विश्रांतवड वडगांव रोड २५ एकर, ७ )मुक्ताई मंगल कार्यालया समोर १ एकर, १७ जून पासून पालखी सोहळ्या साठीचे तात्पुरते वाहन तळ व्यवस्था रहाणार आहे. भाविक, नागरिक आणि वारकरी यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. यात आळंदीतील कोणत्याही रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत. नो पार्किं मध्ये वाहने पार्क केल्यास दंडात्मक करावी केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. नो पार्किं मध्ये वाहने पार्क होत असल्याने आळंदीत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. वाहन चालकांनी या बाबत दक्षता घेऊन योग्य त्या ठिकाणी तसेच रहदारीला अडथळा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments