Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी पंचक्रोशीसह परिसरात वटपौर्णिमा साजरी

वटवृक्षाचे पूजन, वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी परिसरासह पंचक्रोशीत वटपौर्णिमा महिलांनी प्रथा परंपरेचे पालन करीत उत्साहात साजरी केली. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करीत महिलांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी सामाजिक बांधिलकीतून वट पौर्णिमा साजरी केली. 

 येथील अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वटपौर्णिमा उत्सवा निमित्त वटवृक्षाचे पूजन, वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचा संकल्प करीत साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांनी अजिंक्य डी वाय पाटील महाविद्यालय परिसरात वटवृक्षाचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.  उपक्रमा दरम्यान संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ फारुख सय्यद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख डॉ भाग्यश्री ढाकुलकर,  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दिलीप घुले यांनी सदर उपक्रमाचे संयोजन केले. उपक्रम यशस्वीतेस महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. आळंदी येथील पुरातन विश्रांतवड, सिद्धबेट, तसेच रस्त्यांचे दुतर्फ़ा असलेल्या वट वृक्षाचे परिसर मध्ये महिलांनी वट पौर्णिमा साजरी करण्यास गर्दी केली. वट वृक्ष पूजा करून अनेक ठिकाणी वट वृक्षासह इतर विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments