श्री स्वामी महाराजांना गरुड वाहन उटी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मृग नक्षत्र निमित्ताने श्री स्वामी महाराजांना गरुड वाहन श्री विष्णु, लक्ष्मी, अलक्ष्मी सह चंदन उटीचा सुरेख अवतार श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात परिश्रम पूर्वक साकारण्यात आला. प्रथा परंपरे प्रमाणे मनीष, प्रशांत, कैवल्य, गजानन, माधव आणि सुधीर गांधी परीवाराने यासाठी परिश्रम घेतले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासह श्री स्वामी महाराज मठात देखील श्रींचे संजीवन समाधीवर गुढी पाडव्या पासून मृग नक्षत्रा पर्यंत चंदन उटी लावण्याची परंपरा आहे. या निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत संस्थान तर्फे चंदन उटी लावण्यात आली. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त निलेश महाराज लोंढे, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी चनदान उटी पूजा करीत सांगता केली. यावेळी पौरोहित्य वेदमूर्ती निखिल प्रसादे यांनी केले.
मृग नक्षत्र निमित्ताने श्री स्वामी महाराजांना गरुड वाहन श्री विष्णु, लक्ष्मी, अलक्ष्मी सह चंदन उटीचा सुरेख अवतार श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात वैभवी रूप साकारण्यात आले. श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठात श्रींचे पुजारी सुधीर गांधी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी आणि गांधी परिवार तर्फे परंपरेने श्रीचे वैभवी अवतार रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. श्रींचे चंदन उटी वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविक नागरिकांनी आळंदीत गर्दी केली. आळंदीतील विविध मंदिरांत गुढी पाडव्या पासून चंदन उटी लेप लावला जातो. रविवारी ( दि. ८ ) चंदन उटीची सांगता करीत शेवटची उटी स्वामी महाराज मंदिरात झाली. माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधीस चंदन उटी लावत सांगता झाली.
आळंदी पंचक्रोशीतील मंदिरांत प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्या पासून श्रीचे संजीवन समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो .चैत्र महिन्यातील पहिली चंदन उटी आणि मृग नक्षत्रात शेवटची चंदन उटी झाली. या निमित्त मंदिरांत श्रीचे संजीवन समाधीवर विविध आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे वैभवी रूप चंदन उटी तून साकारले जाते. श्री संत ज्ञानदेवांच्या ऊटी पूजा उत्सवाची सांगता कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त निलेश महाराज लोंढे, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते ऊटी पूजेनी झाली. यावेळी सर्वानी श्री संत ज्ञानदेवांचे आशीर्वाद घेतले.
.jpeg)

Post a Comment
0 Comments