Type Here to Get Search Results !

Alandi वडमुखवाडीत माऊलीच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरात भक्तिमय स्वागत

अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व  आरती

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात वडमुखवाडी येथे भक्तिमय उत्साही हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. प्रथा आणि परंपरे नुसार माऊलींच्या पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर माऊलींच्या वैभवी पादुकांची महापूजा, दूध, दही व मधाचा अभिषेक मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व  आरती झाली. यावेळी परिसरातील असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

पंढरपूरच्या आषाढी वारीकडे प्रस्थान करताना माऊलींची पालखी थोरल्या पादुका मंदिरात परंपरेने विसाव्यास थांबली. येथे श्रींचे पादुका दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती.  माऊलींच्या पादुकांना पुष्पहार, तुळशीमाळ, श्रीफळ, पुरणपोळी  नैवेद्य व पेढे अर्पण करून महानैवेद्य झाला.

मंदिर परिसर रांगोळी व फुलांच्या पायघड्यांनी सजवण्यात आला होता. यावेळी पालखी सोहळा मालक  ऋषिकेश आरफळकर यांचे हस्ते पालखीतून श्रींचे पादुका मंदिर गाभाऱ्यात आणण्यात आल्या. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर,  यांचा सत्कार ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे, रवींद्र गायकवाड, मनोहर भोसले, राजेंद्र नाणेकर, रमेश घोंगडे आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रांगोळी कलाकार रोहिणी परतगुल्ले यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत होते.

Post a Comment

0 Comments