जाईन गे माये तया पंढरपुरा ! अवघाचि संसार सुखाचा करीन !!
आनंदे भरीन तिन्ही लोक ! भेटेन माहेरा आपुलिया !!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा दिनास गुरुवारी पहाटे घंटानादाने सुरुवात झाली. सायंकाळी गुरुवार काढण्यास आणि त्या नंतर रात्री उशिरा माउलींच्या पालखी सोहळ्याने आळंदी मंदिरातून प्रस्थान ठेवले. त्यापूर्वी 'माउली..माउली. माउली.' नामाचा वारक-यानी एकच जयघोष केला.
ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊली नामजयघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमली
अलंकापुरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय' अशा जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्या साठी अलंकापुरीत भाविकांची रीघ लागली. पहाटे पासून पवित्र इंद्रायणी नदीला महापूर आला असल्याने इंद्रायणी स्नान करून इंद्रायणी दर्शन घेत भाविकांनी दिंडी दिंडीतून प्रदक्षिणा पूर्ण केल्या. ज्ञानदेवांच्या समाधीचे वारक-यानी डोळे भरून दर्शन घेतले. शेतीची कामे अजून उरकली नसल्याने पीक पाणी पुरेशा प्रमाणात व्हावे यासाठी साकडे घातले. श्री ज्ञानोबारायांच्या पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा महा मेळावा भरला होता. दर्शनाची दर्शनबारी रांग व अलंकापुरी भाविकांनी फुलली होती. प्रस्थान प्रसंगी आळंदीतील उंच इमारतीं वरून प्रस्थान सोहळा पाहण्यास भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातील विविध ठिकाणांहून पायी वारी करत आलेल्या दिंड्या असंख्य भाविकांच्या दिंड्याने आळंदी दुमदुमली. आळंदीत पावसाने हजेरी लावल्याने भाविकांना दर्शनरांगेत ही अंगावर सरी झेलल्या. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मोठा राहिला. प्रदीर्घ वेळे नंतर श्रींचे दर्शन झाल्याने समाधान चेहर्यावर होते.
आळंदीत दाखल झाल्या नंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा नामजयघोष भाविक करत राहिल्याने परिसर दुमदुमून गेला होता. भाविक दर्शनबारीत माऊलींचा गजर करत वरुणराजाचे हजेरीत दंग झाले होते. या वर्षी पावसाने पवित्र इंद्रायणी तीरी व मंदिराच्या प्रकारात महिला वारकरी फेर, फुगड्या करत आनंद घेत प्रस्थान सोहळ्यात रंगल्या. पुरुष वारकरी भाविक ही देहभान विसरून नाचले. भाविकांच्या सुरक्षिततेस पोलीस प्रशासनाचा इंद्रायणी नदी परिसरात आळंदीत ठीक ठिकाणी तैनात बंदोबस्त राहिला.
माऊलींचे मंदिरात श्रींचे पालखीचे वैभवी प्रथा परंपरांचे पालन करीत कार्यक्रम झाले. यात संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील विना मंडपातून माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी असल्याने पहिली गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा करत गुरुवार काढला. दरम्यान सोहळ्यातील दिंडीना मंदिरात प्रवेश देण्यात आला. प्रस्थान सोहळ्याची तयारी दरम्यान देवस्थान ने पूर्ण केली. प्रस्थान दिनी पहाटे घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक झाला. भाविकांच्या महापूजा व समाधी दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. प्रस्थांचे तसेच गुरुवार काढण्यासाठी श्रींची दर्शन बारी प्रस्थान पूर्ण होई पर्यंत बंद ठेवण्यात आली. मंदिरात दुपारचा नैवेद्य, भाविकांना दर्शन बंद करण्यात आले होते. त्या नंतर भाविकांना पुन्हा समाधी दर्शन व्यवस्था झाली. मात्र यावर्षी गुरुवार आणि प्रस्थान एकत्र आल्याने मोठ्या कालावधीसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. प्रस्थानसाठी मंदिरात परंपंरेने मंदिर स्वच्छता, प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या ४७ दिंड्यांसह उप दिंड्या यांना मंदिरात हरिनाम गजरात प्रवेश देण्यात आला. माऊलींना पोशाख, गुरूहैबतबाबा यांचे वतीने परंपरागत मानाची आरती झाली. त्यानंतर संस्थानची आरती व मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप परंपरेने करण्यात आले. नंतर वीणा मंडपात सजलेल्या पालखीत माऊलींच्या चलपादुका ठेवण्यात आल्या.देवस्थान तर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप झाले. श्रीगुरूहैबतबाबांच्या वतीने नारळ प्रसाद, माउलींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ सेवकांनी विना मंडपा बाहेर नाम जय घोषात आणण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा करून देऊळ वाड्यातून श्रींची पालखी रात्री उशिरा प्रस्थान ठेवले. मंदिर व ग्रामप्रदक्षिणा करत पालखी आळंदी ग्रामस्थ खांदेकरी यांनी नामजयघोषात महाद्वारातुन मंदिरा बाहेर आली. ग्रामप्रदक्षिणा झाल्या नंतर समाज आरतीने सोहळा एक दिवसाचे मुक्कामास आळंदीतील गांधीवाडा अर्थात आजोळघरी रात्री उशिरा समाज आरतीने विसावाला. शुक्रवारी ( दि.२० ) पालखी सोहळा पुण्याकडे आळंदीकरांचा निरोप घेत मार्गस्थ होणार आहे. आजोळघर, मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाटावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविक, नागरी आणि सोहळ्याचे सुरक्षिततेस यावर्षी अधिक प्राधान्य देण्यात आले होते.
आळंदी नगरपरिषद तर्फे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा लाईव्ह प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. यात विविध ठिकाणी थेट प्रक्षेपणासाठी मोठी स्क्रीन व्यवस्था नगरपरिषद चौक, लक्ष्मी माता चौक , पाण्याच्या टाकी जवळ, श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक, भराव रस्ता घासवाले धर्मशाळा समोर, आळंदी शहरातील प्रत्येक ठिकाणी एलईडी वॉल बसविणेत आली होती. या मुळे भाविकांना प्रस्थान सोहळा पाहता आला. वरून राजाचे हजेरी मध्ये श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान वीणा मंडपातून रात्री उशिरा पाऊणे अकरा वाजताच सुमारास हरिनाम जयघोषात लाखो भाविकांचे उपस्थितीत झाले.
सोहळ्यास प्रमुख उपस्थिती - श्रींचे प्रस्थान सोहळ्यास पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश तथा आळंदी देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र महाजन, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार संजय जाधव, विभागीय आयुक्त ,चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, आमदार बाबाजी काळे, आमदार महेशदादा लांडगे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्थ राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, श्रींच्या पालखी सोहळ्यातील मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, अश्व सेवेचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, श्रींचे सेवक चोपदार रामभाऊ रंधवे, राजाभाऊ रंधवे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर फडकरी, दिंडीकरी,वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचे नियंत्रणात पोलीस बंदोबस्त - पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे नियंत्रणात आळंदीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीसीपी डॉ. शिवाजी पवार, एसीपी राजेंद्र गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, सतीश नांदुरकर, बापूसाहेब ढेरे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींचे माध्यमातून बंदोबस्त लावण्यात आला होता.
आळंदी नगरपरिषदेची थेट प्रक्षेपणासाठी मोठी स्क्रीन - व्यवस्थाआळंदी नगरपरिषद तर्फे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा लाईव्ह प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. यात विविध ठिकाणी थेट प्रक्षेपणासाठी मोठी स्क्रीन व्यवस्था नगरपरिषद चौक, लक्ष्मी माता चौक , पाण्याच्या टाकी जवळ, श्रीमंत भैरवनाथ महाराज चौक, भराव रस्ता घासवाले धर्मशाळा समोर,आळंदी शहरातील प्रत्येक ठिकाणी एलईडी वॉल बसविणेत आली होती. या मुळे भाविकांना प्रस्थान सोहळा पाहता आला. वरून राजाचे हजेरी मध्ये श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान वीणा मंडपातून रात्री उशिरा हरिनाम जयघोषात लाखो वारकरी, भाविकांचे माऊली माऊली नामजय घोषात श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.
ठळक :-
आळंदी देवस्थानाचे पूर्व नियोजन,चोख पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर.
राज्यातून दिंड्या अलंकापुरीत प्रवेशल्या.
इंद्रायणीचा घाट वारकरी भाविकांनी तसेच महापुराने सजला.
ज्ञानोबा तुकाराम नामजयघोष अलंकापुरी दुमदुमली.
माउली ग्रुप तर्फे पालखी सजावट.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष एकाचे प्राण वाचविले .
आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके यांचे विशेष परिश्रम
संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा.
गुरुवार काढलेणे प्रस्थान सोहळ्यास उशीर.

.jpeg)






Post a Comment
0 Comments