असा होणार प्रस्थान सोहळा ; बिडकर वाड्यातील गोपालकृष्ण मंदिरात अश्वांचे स्वागत
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : माउली मंदिरात प्रस्थान दिनी पहाटे चार वाजता घंटानाद , सव्वा चार वाजता काकडा, त्यानंतर पवमान अभिषेख, पंचामृत पूजा व दुधारती, पाच वाजता भाविकांच्या श्रींचे चल पादुका महापूजा, सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, सकाळी नऊ वाजता विना मंडपात कीर्तन, दुपारी महानैवेद्य त्या नंतर भाविकांना समाधी दर्शन, परंपरेने मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्या नंतर गुरुवारची पालखी सायंकाळी सहाचे सुमारास निघणार आहे. त्या नंतर मुख्य प्रस्थान सोहळा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. गुरुवार असल्याने यावर्षीचे प्रस्थान गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळ्यातील दिंड्याना मंदिर प्रवेश सुरु, श्रींचा पोशाख, प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रम सुरु होतील. या मध्ये श्रीगुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे श्रींची आरती, या नंतर देवस्थान तर्फे आरती, प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, विना मंडपात पालखीत श्रींचे चल पादुकांची पूजा, प्राणप्रतिष्ठापना, देवस्थान तर्फे मानकरी यांना मनाचे पागोटे वाटप, श्री गुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे दिंडी प्रमुख मानकरी,पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप, श्रींचे समाधी जवळ संस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप, पालखीचे विना मंडपातून हरिनाम गजरात गुरुवारी रात्री उशिरा हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. दरम्यान श्रींचे पालखीची पुन्हा मंदिर प्रदक्षिणा व नगरप्रदक्षिणा करून श्रीं चा वैभवी पालखी सोहळा शाही लवाजम्यासह हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गे भराव रस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर चौक मार्गे चावडी चौकातून महाद्वार पासून जुन्या गांधी वाड्यातील नवीन दर्शन बारी मंडपात आजोळघरी पहिल्या मुक्कामास विसावणार आहे. पहिला मुक्काम गांधी वाड्याचे जागेत तत्पूर्वी समाज आरती आणि रात्री हरी जागर आणि गांधी वाड्यात भाविकांना पालखीचे दर्शन होणार आहे. शुक्रवारी ( दि. २० ) श्रींचा वैभवी पालखी सोहळा पुण्यनगरीकडे हरिनाम गजरात मार्गस्थ होणार आहे.
बिडकर वाड्यातील गोपालकृष्ण मंदिरात अश्वांचे स्वागत
येथील इंद्रायणी नदीकाठावरील बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडी वड्या बाहेर हरिनाम गजरात आली. प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा गोपालकृष्ण मंदिरात झाली. यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार, महादजीराजे शितोळे सरकार, आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील यांचा सन्मान हरप्रीतसिह बिडकर सरदार, उमेश बिडकर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शामराव मलठणकर,जगन्नाथ जुन्नरकर, सुवर्णकार विचार मंच पदाधिकारी, सदस्य आदींसह भाविक, वारकरी उपस्थित होते. मंदिरात देखील देवस्थानचे पदाधिकारी यांचे वतीने अश्व मालक शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला.
.jpg)

Post a Comment
0 Comments