Type Here to Get Search Results !

Alandi मरकळ पंचलिंग गुरुदेवदत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सर्वांनी माता - पिता, गुरुजनांचा कायम आदर राखावा :- ताई माऊली महाराज 




आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सर्वांचे आई, वडील आणि शिक्षक हे खरे गुरु आहेत. मनुष्य किती ही मोठा झाला तरी आई, वडील, गुरुजनां विषयी कायम आदरभाव ठेवत गुरु शिष्य परंपरा जोपासण्याची गरज असल्याचे पंचलिंग गुरुदत्त मंदिरात अध्यक्षा ताई माऊली महाराज यांनी सांगितले. 

  मरकळ येथील मंदिरात कार्यक्रमांचे संयोजन देवस्थानाचे प्रमुख दत्तभक्त ताई माऊली यांच्या मार्गदर्शनात पार पडले. यावेळी गाव पुरोहित रामदास सोमवंशी, पुजारी वामन काका मरकळे यांच्या हस्ते मातृ लिंगांचा अभिषेक, शत चंडी होम हवन करण्यात आला. श्रींची महाआरती व दत्तभक्त ताई माऊली प्रवचन रूपी गुरु आणि शिष्य यांचे नातं या बद्दल प्रबोधन झाले. शिष्य व महिला भाविक यांनी ताई माऊली यांना पंचामृत स्नान केले. चरण पादुका पूजन, गुरु भेट उत्सव झाला. महाप्रसादाचा वाटप भाविकांना उत्साहात झाले. सर्व शिष्य मंडळी व आलेल्या महिला भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप झाला. हरिपाठ, भजन, पालखी प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. या प्रसंगी अरुणाताई गाडे, गोरक्षनाथ महाराज वर्पे, माजी चेअरमन बाजीराव सोपान लोखंडे, हनुमंत आव्हाळे, मारुती अर्धाळकर, अर्जुन वाघचौरे, स्वप्निल भोसले, पांडुरंग दाते, नंदू पाटोळे,  दत्ता थिटे, लक्ष्मण नेटके, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, राजेश नागरे, सुहास सावंत, कविता लोखंडे, पवार कवितके, सुनील हिंगणे, भागवत शितोळे, शिवाजी माशिरे,  ह भ प वाबळे महाराज, कैलास होले, रितेश बटुले, समर्थ पोकळे, गणेश हिंगणे, महिला सेवेकरी होले मावशी, लता हिंगणे, जंगम ताई, निकम ताई, ताई वागस्कर, दाते ताई, ग्रामपंचायत सदस्य उज्वला संभाजी लोखंडे, ताराताई वाबळे यांच्या मार्गदर्शनात महाप्रसाद वाटप, नियोजन करण्यात आले.

आळंदी परिसरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी करण्यात आली. गोपाळपुरातील वैभवी श्री विठ्ठल मंदिरात श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, श्रींची पूजा, आरती, महाप्रसाद वाटप करण्यात आले. भाविकांनी श्रींचे दर्शनासह महाप्रसादास गर्दी केली. आळंदी माऊली मंदिरात पूजा, धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. परमेश्वर महाराज फफाळ यांचे कीर्तन देखील गुरुपौर्णिमे निमित्त हरिनाम गजरात झाले. श्री स्वामी समर्थ मंदिर मठात पूजा, धार्मिक कार्यक्रम, प्रसाद वाटप हरिनाम गजरात झाले. विविध शाळांत गुरुपौर्णिमा परंपरेने गुरुशिष्य परंपरा जोपासत झाली. यावेळी गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार पारितोषिक वितरण करीत साजरी करण्यात आली. अनेक शालेय मुलांनी आपापल्या शिक्षकांस भेट वस्तू देत त्यांचे पूजन करीत आशीर्वाद घेत गुरुपौर्णिमा साजरी केली. पंचलिंग गुरुदेवदत्त मंदीर मरकळ येथे गुरुपौर्णिमे निमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.  मरकळ येथे मिरवणूक, टाळ, मृदंग वाद्याचे गजरात गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात झाली. श्रीगुरुदेव दत्त पंचलिंग मंदिरात भाविकांनी गुरु पौर्णिमे निमित्त श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. रांगा लावून श्रींचे दर्शन घेत भाविकांनी मोठ्या धार्मिक मंगलमय उत्साही वातावरणात महा प्रसादाचा लाभ घेतला. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती.   

Post a Comment

0 Comments