एकतेसह आध्यात्मिक वातावरण निर्मिती
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील लुमॅक्स अॅन्सिलरी लिमिटेड, चाकण या कंपनीत पवित्र आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साही भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यातून एकतेसह आध्यात्मिक वातावरण निर्मिती निर्माण करीत उत्साही वातावरणात आषाढीचा सोहळा साजरा करण्यात आला.
या निमित्त श्री विठ्ठल पूजन व आरती दर्शन उत्साहात झाले. यावेळी उपस्थितांनी सर्वांसाठी शुभाशीर्वाद मागत सोहळा साजरा केला. एकत्र चालत, संस्थेच्या मूल्यांचा प्रसार करत एकतेचे प्रतिक म्हणून पंढरपूर वारीची अनुभूती यावेळी सर्वांनी घेतली. पारंपरिक फुगडी आणि ताला सोबत नृत्य सादर करत आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यात आला. ही वारी आपल्याला आठवण करून देते की, जेव्हा संस्कृती आणि संस्थेची मूल्ये एकत्र येतात, तेव्हा एक घनिष्ठ, सकारात्मक आणि जोडलेली कार्य संस्कृती निर्माण होते. यावेळी लुमॅक्स अॅन्सिलरी लिमिटेड, कंपनीचे प्लांट हेड नारायण पांढरे, एच आर मॅनेजर सचिन सोनटक्के, एच आर एडमिन सागर थोरात, एच आर एक्झिक्यूटिव्ह ज्योती नलवडे, आयटी डिपार्टमेंट योगेश कापुरे, अकाउंट एक्झिक्युटिव्ह श्रुती कासार यांच्या विशेष प्रयत्न आणि पुढाकाराने आषाढी वारी दिंडी सोहळा उपक्रम यशस्वी झाला.

.jpeg)

Post a Comment
0 Comments