भाजी विक्रेत्यांनी रहदारीचे अडचणी बाबत दक्षता घ्यावी ; मुख्याधिकारी खांडेकर
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे शेजारील भाजी मंडई परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते यांचेवर अतिक्रमण करावी करण्यात आली आहे. भाजी विक्रते, शेतकरी, शेतमाल विक्रेते यांची नगरपरिषद प्रशासनाने रुग्णालयाचे लगतचे जागेत व्यवस्था केली आहे. भाजी विक्रेते रस्त्यावर शेतमाल घेऊन रहदारीस अडथळा ठरत असल्याने रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता भाजी मंडईतील भाजी विक्रेते यांनी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले.
आळंदी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी यांच्या साठी भाजी मंडई प्रशस्त जागेत भरण्याचा निर्णय यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जाहीर केला. होता. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार येथील मोकळ्या प्रशस्त जागेत भाजी मंडई तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येई पर्यंत सुरू करण्यात येणार होती. मात्र त्यावेळी स्थलांतरित न करता आहे त्याच ठिकाणी समज देऊन दैनंदिन भाजी मंडई रस्त्यावर अडथळा करणार नाही अशी विक्रेते आणि संघटनेच्या पदाधिकारी यांनी ग्वाही दिली होती. यामुळे बाजार हा शाळा क्रमांक चार च्या जागेत स्थलांतरित करण्याचे राहिले. तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संबंधित प्रशासन आणि भाजी विक्रते यांना या संदर्भात आवाहन देखील केले होते. आळंदी नगरपरिषद विकास आराखड्यात भाजी मंडईसह इतर आरक्षणे असून अद्याप पर्यंत गेल्या अनेक वर्षा पासून भाजी मंडई आरक्षित जागेवर विकसित करण्यात आली नाही. येथील गैरसोय पाहता येत्या सहा महिन्याच्या कालावधीत आरक्षित जागेमध्ये कायम स्वरूपी भाजी मंडई ची व्यवस्था करण्यात येईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. यासाठी थोडा वेळा जाणार असल्याचे सांगत तात्पुरत्या स्वरूपात शाळा नंबर चार येथील मोकळ्या जागेत भाजी मंडईची व्यवस्था करण्याचे नियोजन केले होते. मात्र त्यावेळी अचानक सदर ठिकाणी जाण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता. प्रशस्त जागेत भाजी मंडई भरवली जाणार होती. यासाठी नागरिक, भाजी विक्रेते, व्यापारी, नागरिक, ग्राहक यांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले होते. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे शेजारील सध्या सुरू असलेली भाजी मंडईची ही जागाही खूप वर्दळीच्या ठिकाणी आणि शांतता झोन असलेल्या आळंदी ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद शाळा, आणि पोलीस स्टेशन या लगत असल्याने या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे नागरिक भाविकांचे आरोग्याची काळजी घेत भाजी मंडईची पर्यायी जागेत व्यवस्था जाहीर करण्यात आली होती.
आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून भाजी मंडईचे आरक्षण लवकरात लवकर विकसित केले जाणार आहे. तो पर्यंत शाळा क्रमांक चार च्या मैदानावर भाजी मंडई भरली जात आहे. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते. आळंदी ग्रामीण रुग्णालयात रुग्णास नेत असताना रुग्णवाहिकेस वाहतूक कोंडीमुळे विलंब झाला. यात एका युवतीचे उपचारा पूर्वी नुकतेच निधन झाले होते. यामुळे भाजी मंडईच्या स्थलांतराचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र स्थलांतर झाले नाही.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, आळंदी पोलीस स्टेशन, स्थानिक पदाधिकारी यांची बैठक आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या दालनात या पूर्वी घेण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, बांधकाम अभियंता सचिन गायकवाड, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, कविता भालचिम, माजी विरोधी पक्षगट नेते डी.डी. भोसले पाटील. माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते. या बैठकीत घडलेल्या घटने बाबत चर्चा करण्यात आली होती. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच भाजी विक्रेते यांना कायम स्वरूपी जागा देण्यासाठी आळंदी नगरपरिषद दुसरी सुधारित विकास आराखडा योजना यात भाजी मंडईचे जागा आरक्षण विकसित करणे तसेच तो पर्यंत शाळा क्रमांक चार येथे व्यवस्था करणे आणि आळंदी पंचक्रोशीतील रुग्णांना भविष्यात रुग्ण आरोग्य सेवेच्या हक्का पासून वंचित राहू नये सर्व रुग्णांना प्रभावीपणे आरोग्य सेवा मिळावी यासाठी संवाद साधण्यात आला होता. भविष्यात दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. आळंदी ग्रामीण रुग्णालय परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये रस्ता रहदारीला कायम स्वरूपी खुला राहील. यासाठी संबंधितांनी प्रभावीपणे नियोजन करण्यासह उपाय योजना, चर्चा, मार्गदर्शन या संवाद बैठकीत झाले होते. मात्र आता पुन्हा या भाजी मंडईचे समोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा करून रहदारीचे दृष्टीने गैरसोयीचे होत असल्याने नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी तात्काळ भाजी मंडई कडील रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करीत आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा ९ मीटर रुंदीचा रस्ता वापरास खुला करून देत अतिक्रमण वर कारवाई केली. विक्रेते यांनी रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर याणी केले आहे.


Post a Comment
0 Comments