एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : “Connect and Empower Research: Open Access, Open Data, and Research Metrics” या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २ जुलै २०२५ रोजी एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आले. कार्यशाळा INFLIBNET सेंटर, गांधी नगर, गुजरात यांच्या सहकार्याने २ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. मोहम्मद मोस्तफा (DataCite, जर्मनी) हे होते, जे UNESCO Working Group on Open Science Infrastructure ते मान्यवर सदस्य आहेत. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी खुले विज्ञान, पारदर्शक संशोधन व्यवस्था आणि जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात जपान मधील National Institute of Informatics येथील प्रो. हिदेआकी ताकेदा व सह. प्रो. मिहो फुनामोरी यांनी विशेष आमंत्रित वक्ते म्हणून सहभाग घेतला. त्यांनी semantic तंत्रज्ञान, open science ethics आणि जागतिक शैक्षणिक संवाद यावर सखोल विचार मांडले. दिव्य ज्ञानाचे प्रतीक असलेल्या दीपप्रज्वलन सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली, जिथे सरस्वती वंदनेच्या सुरांमध्ये विद्येचे स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी मानद सचिव, एआयएसएसएमएस मालोजी राजे छत्रपती, मानद सहसचिव सुरेश शिंदे,
मानद कोषाध्यक्ष अजय पाटील, अध्यक्ष, व्यवस्थापन समिती अॅड. भगवानराव साळुंखे, प्राचार्य, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय डॉ. डी. एस. बोरमाने, ग्रंथपाल व कार्यक्रम समन्वयक
डॉ. वृषाली डांडवते यांनी आपले विचार व्यक्त करीत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधनात पारदर्शकता, सहयोग आणि जागतिक विचार धारा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास भारत भरातील संशोधक, ग्रंथपाल, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया चव्हाण यांनी केले.
समारोप मन:पूर्वक आभार प्रदर्शनाने उत्साहात झाला.

Post a Comment
0 Comments