Type Here to Get Search Results !

Alandi देवर्षी नारद यांचे गादीचे पावित्र्य जोपासण्याचे कीर्तनकारांना आळंदीत आवाहन

आळंदीत सर्व पक्षीय आंदोलनात भंडारे यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कीर्तनकार शब्दरत्न संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याने राज्यात वाद सुरु झाला आहे. आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका असे वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले. राज्यात वारकरी संप्रदाय, काँग्रेस सह अनेक पक्षांनी या वक्तव्याची दखल घेत जाहीर निषेध केला. आळंदीत देखील  सर्वपक्षीय पदाधिकारी व आळंदी ग्रामस्थानी माऊली मंदिराचे महाद्वार प्रांगणात जमून भंडारे महाराज यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी शिवसेनेचे नेते उत्तम गोगावले म्हणाले, या पुढील काळात कोणत्याही महाराजांनी आपल्या आडनावापुढे आळंदीकर लिहायचे नाही असा खणखणीत इशारा देत भंडारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.    

 या प्रसंगी निषेध सभेस माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते उत्तमराव गोगावले, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज राका, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे ( एस.पी. गट. ), काँग्रेसचे संदीप नाईकरे पाटील, प्रकाश घुंडरे, सौरभ गव्हाणे, सतीष कुऱ्हाडे, सागर रानवडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश आरु, संजय वडगांवकर, माऊली घुंडरे, प्रसाद बोराटे, महेश‌ कुऱ्हाडे यांच्यासह आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

  यावेळी उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भंडारे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत खणखणीत इशारा दिला. आळंदीतून नारदाची गादीचा अपमान सहन केला जाणार नाही. कीर्तनाचे विषयवार बोलण्या प्राधान्य देऊन कीर्तनातील प्रथा परंपरांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महाद्वार चौकात कीर्तन, प्रवचनकाराना आवाहन करणारा फलक लावण्यात आला होता. त्यावर आपण समाज प्रबोधन करा. महाराज म्हणून आम्ही आपला कायम आदर करू असे लिहिले होते. भंडारे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत समाजात ताण तणाव निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. भंडारे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आळंदी पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी संतप्त आळंदी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. 

यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक यांचेसह आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी शांतता सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी काम पाहिले.    

Post a Comment

0 Comments