Type Here to Get Search Results !

Alandi अविनाश पाटील यांच्या सोलो वादनाने बालचमुनसह श्रोते मंत्रमुग्ध

 श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत मृदुंग कार्यशाळा 


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी काठावरील श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत मृदुंग कार्यशाळा हरिनाम गजरात उत्साहात झाली. राज्यातील वारकरी विध्यार्थी येथे शालेय शिक्षणा समवेत वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेत आहेत. 

   येथे शिकत असलेल्या वारकरी संप्रदायातील शालेय मुलांसाठी प्रसिद्ध मृदुंग वादक दादा पाटील, चिरंजीव अविनाश पाटील यांनी मृदुंग कसा वाजवायचा, मृदुंग कसा तयार झाला, मृदुंगाचे बोल, मृदुंगाची थाप, मृदुंग बद्दल मुलांना त्यांनी सवाद्य मार्गदर्शन केले. भविष्यात येथील विद्यार्थी समाजात आपली कला जोपासण्यास रियाज कसा करावा, किती वेळ करावा याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश पाटील यांचे सोलो वादन उत्साहात झाले. सोलो वादनास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत सोलो वादन श्रवणाचा आनंद घेतला. यावेळी संस्थेतील मुलांचे सामुदायिक मृदुंग वादन झाले. दादा पाटील यांनी या मुलांना शिकवणाऱ्या रवींद्र कुमकर या शिक्षकाचे कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, रवींद्र जोशी, अनिल बोडके, नितीन ननवरे, विशाल तापकीर, अशोक महाराज चौरे, रामचंद्र महाराज सारंग, पृथ्वीराज कराळे, अशोक सालपे, सचिन शिंदे, पवन लिंगायत,   श्रीरामकृष्ण अध्यात्मिक  वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे उपस्थित होते.  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० जन्मोत्सवी वर्षा निमित्त पाच दिवशीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यातून आळंदीतील मुलांना सोलो शिक्षणास मदत होईल. असे दादा पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments