श्री माऊलींचे थोरल्या पादुका मंदिरात पसायदान फलकाचे अनावरण
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जगातील सर्व श्रेष्ठ विश्व प्रार्थना म्हणजेच माऊलींचे पसायदान सर्व जग सुखाच्या शिखरावर्ती विराजमान व्हावे आणि सर्व जगाने सत्कर्मा मध्ये रममान व्हावे या साठी विश्वात्मक देवाकडे केलेली प्रार्थना म्हणजेच पसायदान होय. असे उदगार श्रीसंतज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी पसायदान या नामफलकाचे उदघाटन वङमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात केले. यावेळी ते बोलत होते.माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात पसायदान या नामफलकाचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सदस्य संदेश नवले यांच्या वतीने पसायदान नामफलक मंदिरास अर्पण करण्यात आला. या वेळी महादेव महाराज तौर, राजाराम महाराज साठे, ॲड जयराम शिंदे, गणेश महाराज तापकीर, मनोहर भोसले, साहेबराव काशीद, चंद्रकांत मोरे,रमेश महाराज घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते . या वेळी संदेश नवले यांनी केलेल्या कार्या बद्दल त्यांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व माऊलींचा फोटो देऊन करण्यात आला. पसायदानाने सांगता झाली.

Post a Comment
0 Comments