Type Here to Get Search Results !

Alandi माऊली मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण

सिध्दबेटात रक्षणबंधन साजरे ; त्र्यंबकेश्वर आणि आळंदी येथील राखी अर्पण 



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठविलेली राखी श्रींचे समाधीला स्पर्श करीत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे वतीने श्रींचे संजीवन समाधीला स्पर्शित राखी श्रींचे गाभाऱ्यात परंपरेने अर्पण करण्यात आली.

   या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, सम्राट पाटील, प्रतिभा पाटील, मीनाताई पाटील, मुक्ताई पालखी सोहळा अश्व मानकरी संदीप महाराज भुसे ( मरकळ )  माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, ह.भ.प. विचारसागर महाराज लाहूडकर, संदीप पालवे, आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे विश्वस्त अर्जुन मेदनकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,    विशाल महाराज खोले उपस्थित होते.

 श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे वतीने मुक्ताबाई संस्थानचे वतीने श्रींना रक्षा बंधन दिनी श्रींचे संजीवन समाधीस स्पर्शीत करून राखी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी वारकरी भावीक यांचे उपस्थितीत माऊली मंदिरात श्रीनां राखी अर्पण करीत भारतीय संस्कृती जोपासत रक्षा बंधन साजरी करण्यात आली. यावेळी भाविकणाचे वतीने चांदीची हि राखी श्रीना अर्पण करण्यात आली. 

  रक्षण बंधन दिनी माऊली मंदिरात दर्शनास भाविकांनी महाद्वारात गर्दी केली. आळंदी मंदिर परिसरात भाविकांसह भाविक व पंचक्रोशीतील वाहनाची प्रचंड गर्दी होती. श्रावणी महिना सुरु असल्याने तसेच सुट्टीचे दिवस रक्षाबंधन दिनी भाविकांनी मंदिरात श्रींचे रांगा लावून दर्शनास गर्दी केली होती.  

  आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी रक्षाबंधन दिनी आलेल्या सन्माननीय राख्याची माहिती दिली. मुक्ताईची श्रींसाठीची राखी देवस्थानच्या परंपरागत नियोजन प्रमाणे श्रीनां अर्पण करण्यात आली. रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील महाराज आणि सर्व संबंधित संस्थान यांनी श्रीनां राखी पाठवीत परंपरा कायम ठेवली. यावेळी आदिशक्ती मुक्ताई यांच्या कडून श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड येथे ही श्रीनां राखी अर्पण करण्यास पोच करण्यात आली. आळंदी मंदिरात श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे पदाधिकारी आणि मान्यवर यांचा सन्मान आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हस्ते श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार करण्यात आला. आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुक्ताई संस्थान तर्फे पाटील यांनी सपत्नीक श्रींची पुजा करीत मुक्ताईची ज्ञानदा साठीची राखी समाधीस स्पर्श करीत अर्पण केली. आळंदी संस्थान चे वतीने मुक्ताईस साडी चोळी सुपूर्द करण्यात आली.

  येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत देखील आपल्या आई, वडील आणि बहीण , भाऊ तसेच कुटुंबीय यांचे पासून दूर राहून आळंदीत शालेय शिक्षणा सह अध्यात्मिक शिक्षण घेणास निवासी राहत असलेल्या मुलं, मुलींसाठी रक्षा बंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेत रक्षा बंधन दिना निमित्त मुलांना राखी बांधून सण साजरा केला. यावेळी संस्थेचे वतीने सर्व मुलं-मुलींना सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले.  या प्रसंगी मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे आदी उपस्थित होते. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत तसेच शाळांत साजरे करण्यात आले.  

संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त यांनी सपत्नीक माऊलींना पूजा-अभिषेक करून मुक्ताईची राखी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस अर्पण केली.  

  आळंदी येथील सिध्दबेटात संत लीला भूमीत संतांचे वास्तव्य ठिकाण येथेही श्रींची पूजा, पुष्पहार, पुष्प, शाल अर्पण करीत लहानग्यानी श्रीना राखी बांधत पवित्र भारतीय संस्कृतीचे पालन केले. यावेळी आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, गजानन महाराज लाहुडकर, विचारसागर महाराज पाटील, सुरेश काळे, आदी मान्यवर उपस्थित होते. सिध्दबेटात परंपरेने रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.   

   ज्ञानगंगा ग्रुप ऑफ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळंदी मधील स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या आपल्या सीमेवरील सैनिक बांधवांसाठी जम्मू साठी रवाना करण्यात आल्या. ज्ञानगंगा स्कूल तर्फे सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा प्राचार्य विजय गुळवे यांनी दिल्या. 

Post a Comment

0 Comments