आदर्श माता श्रीमती हौसाबाई सोपानबुवा नलावडे यांचे निधन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्येष्ठ नागरिक, आदर्श माता श्रीमती हौसाबाई सोपानबुवा नलावडे यांचे अल्पशा आजाराने ( वय ९३ वर्ष ) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वाशी नवी मुंबई येथील फळांचे प्रसिद्ध होलसेल व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, शैलेंद्र नलावडे हे मूळचे धोलवड तालुका जुन्नर येथील आहेत. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे हे अनेक वर्षा पासून सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. स्व. हौसाबाई नलावडे या त्यांच्या मातोश्री होत. मातोश्रींचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments