श्री दत्तनगर प्रतिष्ठान आणि एकलव्य प्रतिष्ठानचा उपक्रम
श्री दत्तनगर प्रतिष्ठान हरिपाठ बाल उद्यान गणपती मंदिर मंडळाचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे पाटील यांनी तसेच एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गोडसे, सुरज बोरुंदीया यांचेसह कार्यकर्ते यांनी यासाठी परिश्रम घेतले. एकलव्य प्रतिष्ठान रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी तसेच श्री दत्तनगर प्रतिष्ठान आयोजित शिबिरात ११९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत गणेशटोसावतील उपक्रमात सहभाग घेतला. रक्तदात्यांचा यावेळी मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला. रक्त संकलनाचे कार्य पुणे सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सुरज बोरुंदीया यांनी सांगितले. शिबिरात रक्तदात्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम गणेशोत्सवाच्या उत्साहात समाजहिताचा नवा संदेश देणारा ठरला. स्थानिक पातळीवर मिळालेला प्रतिसाद पाहता प्रतिष्ठानने भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची मालिका राबविण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य सुरज बोरुंदिया यांनी सांगितले. यावर्षी प्रतिष्ठानने सुवर्ण मंदिर विद्युत रोषणाई देखावा सादर करून भाविक, भक्तांची दाद मिळवली.
गणेशोत्सवा निमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव साजरा करत असलेल्या स्पर्धेतील सहभागी गणेशोत्सव देखावे पाहण्यास समितीने आळंदी, चाकण आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावांतील मंडळांत जाऊन पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये आणि समिती सदस्यांनी पाहणी केली. पंचक्रोशीत उत्साही मंगलमय वातावरणात शांततेत उत्सव होत आहे. आळंदीत शांतता, कायदा, सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणात नियोजन केले आहे.



Post a Comment
0 Comments