ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त माऊलींची मूर्ती भेट
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील राजे ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करून शिबिरास उत्साही प्रतिसाद दिला. रक्तदात्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त माऊलींची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या सामाजिक बांधिलकीचे कार्याचे आळंदी परिसरातून कौतुक करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन पुणे फेस्टिवल अध्यक्ष शंकरभाऊ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विधीतज्ञ नाजिम शेख, सरपंच सचिन घोलप, माजी शिक्षण मंडळ सदस्य अविनाश बोरुंदिया, माऊली कुऱ्हाडे, माजी नगरसेवक रमेश गोगावले, भाजपा केंद्रीय समिती सदस्य रामशेठ गावडे,अध्यक्ष दयानंद मंजुळे, विजय (आप्पा) पगडे, नारायण घोलप, विठ्ठल गोडसे, खुशाल चौधरी, माऊली सुतार, एकनाथ चौधरी, संतोष कानडे, सचिन ठाकरे, पोपट म्हेत्रे, माऊली निळे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. रक्त संकलन डॅा.समिर जमादा, डॅा. धर्मराज निळे आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेत संकलन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. राजे ग्रुपने या उपक्रमाद्वारे समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार मंडळाचे अध्यक्ष दयानंद मंजुळे, विजय अप्पा पगडे यांनी व्यक्त केला.
.jpeg)



Post a Comment
0 Comments