ओळख ज्ञानेश्र्वरीची हा मूल्यसंस्कार अंतर्गत उपक्रम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील चिखलीतील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रम उत्साहात सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रशालेत पसायदान घेतले जात आहे. समन्वय मयुरी वाघ, शिवानी गवळी, प्राचार्य रंजना आव्हाड, संस्थापक व्यंकटेश्वराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमात हरिपाठ पठण हरिनाम गजरात झाले. दर सोमवारी हरिपाठ पठण, सार्थ ज्ञानेश्वरीतील ओव्यांची माहिती आणि ओळख ज्ञानेश्र्वरीची हा मूल्यसंस्कार अंतर्गत उपक्रम आनंददायी शनिवार उपक्रमात घेतला जाणार असल्याचे प्रशालेने सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी या हा उपक्रम सुरु केल्या बद्दल प्रशालेचे अभिनंदन करून उपक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments