सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत महारक्तदान
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शेलपिंपळ्गाव ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच अभिषेक दौन्डकर कर दौन्डकार यांचे वाढदिवसा निमित्त सोमवारी ( दि. २२ ) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या सात वर्षांपासून या शिबिराचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. हे शिबीर शेलपिंपळ्गाव येथील श्री हनुमान मंदिरात करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन शेलपिंपळ्गाव ग्रामस्थ आणि युवा उपसरपंच अभिषेक दौन्डकर मित्र परिवार यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments