अन्नदान उपक्रमाने जागतिक शांतता दिन साजरा ; पीस पुलाव आस्वाद
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अजिंक्य डी वाय पाटील समूह लोहगाव मध्ये जागतिक शांतता दिवसाचे औचित्य साधून आळंदीसह विश्रांतवाडी, वाघोली, लोहगाव, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, पुणे रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी गरजूंसाठी अन्नदान करून जागतिक शांतता दिवस पीस पुलाव वाटपाने सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.
अजिंक्य डी वाय पाटील समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली समूहातील रोट्रक्ट क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या सहकार्याने पीस पुलाव- मेगा फूड डोनेशन ड्राईव्ह उपक्रम यशस्वी करण्यात आला. विविध धर्म व पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणून स्वतः विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या देणगी तून पुलाव तयार करून गरजू व्यक्तींसाठी अन्नदान करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीतेस अजिंक्य टी वाय पाटील दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ आनंद शिगली, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ कुलगुरू डॉ राकेश कुमार जैन, अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फारुख सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य डी वाय पाटील समूहातील रोट्रक्ट क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यां मार्फत केलेल्या नाविन्यपूर्वक उपक्रमाबद्दल महाविद्यालयातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या पुढेही असेच समाजपयोगी उपक्रम आयोजित करण्यास या प्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापनाने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments