गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री भानोबा विद्यालय कोयाळी तर्फे चाकण एक उपक्रमशील शाळा. प्रशाला दरवर्षी नवनवीन उपक्रम सातत्याने राबवत असते . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक व धार्मिक जडणघडण व्हावी हा विद्यालयाचा प्रमुख हेतू असतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रशालेमध्ये पारंपारिक वाद्य सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वीर रणांगणा शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सर्जेराव तांबे , सल्लागार संतोषजी दरेकर, सचिव अर्चनाताई सासवडे आणि सर्व प्रशिक्षक टीम व संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच विकासशेठ भिवरे, उपसरपंच उर्मिला कोळेकर ,अजय टेंगले ,राहुल आल्हाट, बापूसाहेब सरोदे,भरत आल्हाट,राजाराम आल्हाट ,अविनाश टेंगले, गवळण दिघे, समाधान भाडळे ,नवनाथ टेंगले, सचिन गंगावणे, रूपाली कुंभार, सुप्रिया निकम,सुप्रिया पानसरे, स्वप्नाली शिंदे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला . विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरीष शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक वाद्यांची माहिती दिली. राजू शेठ गायकवाड, संजय तांबे ,सतीश भाडळे , राजू दिघे , छायाताई कोळेकर ,गायत्री कारंडे ,सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्ट यांच्या सहकार्यातून प्रशालेतील ८५ गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
वीर रणांगणा शैक्षणिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना पेन, रायटिंग पॅड ,स्कूल बॅग तसेच उपस्थित मान्यवरांना पेनचे वाटप करण्यात आले, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संबळ, खंजिरी ,पखवाद, ढोलकी या पारंपारिक वाद्यांचे वादन करून आपल्या कलेचे सादरीकरण केले. वीर रणांगणा शैक्षणिक संस्थेतील प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी लाठीकाठी,तलवारबाजी आणि मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची व पालकांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. सूत्रसंचालन शरद पाटील आणि सूर्यकांत बालघरे यांनी केले. आभार राजेश गायकवाड यांनी मानले. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन स्वाती साठे यांनी केले.

Post a Comment
0 Comments