जिल्हा आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत जोग स्पोर्ट्स १० रौप्य पदके
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पिंपरी चिंचवड क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हा आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत जोग स्पोर्ट्स अकॅडमीच्या कुस्तीगीरानी रिव्हर डेल, नवमहाराष्ट्र,वाघेश्वर विद्यालय, गायत्री विद्यालय अशा शाळे कडून सहभागी होत तब्बल १३ सुवर्ण, १० रौप्य, १२ कास्य पदके मिळविली.
सार्थक आमझरे, सार्थक केदारी, शौर्या यादव, विदिशा कुलकर्णी, सई मेदगे, शरयू व गायत्री यादव, अक्षरा भोसले, अनवी लुगडे यांनी नवमहाराष्ट्र कडून तर ओम घुले, शिवराज मुऱ्हे यांनी रिव्हर डेल कडून, साहिल पगडे ( वाघेश्वर विद्यालय ), हर्षद कदम ( गायत्री विद्यालय ) सुवर्ण पदके मिळविली.
राजवर्धन कटके, सार्थक मारणे, ध्रुव परंडे, सायली घोलसे, प्रांजली तापकीर, स्वरांजली नांदेडकर, आर्या जेधे, आराध्या मुंगसे, ज्ञानदा कदम. यांनी रौप्य पदके मिळविली.
स्पर्श कदम, विराज फडके, मेघराज कदम, रुद्र आवटे, दुर्वेश टिंगरे, साईराज पाबळे, श्री घुले, अजिंक्य रोकडे, रेयांश साठे, विश्वजित भोसले, रितिका पडवळ, श्रवनी जाधव, श्रेया तापकीर, तनसवी पटेल यांनी कास्य पदके मिळविली.


Post a Comment
0 Comments