Type Here to Get Search Results !

अलंकापुरी पोलीस स्टेशन श्रींचे मूर्तीचे गणेशभक्तिमय जल्लोषात विसर्जन

आळंदीत नामजयघोष उत्साहात ; विसर्जन कुंडात श्रींचे मूर्तीचे विसर्जन 




आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी पोलिस स्टेशनचे वतीने आयोजित गणेशोत्सवात वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशन मध्ये परंपरेने गणेशोत्सव धार्मिक, मंगलमय वातावरणात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात आला. श्रींची मूर्तीचे विसर्जन मिरवणूक हरिनाम जयघोष, गणेशभक्तिमय उत्साहात भक्तिमय वातावरणात झाली. विसर्जन मिरवणुकी नंतर प्रसाद वाटप, स्नेहभोजन झाले.   

  आळंदी पोलीस स्टेशन तर्फे श्रींचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी आळंदी पोलीस स्टेशन ते इंद्रायणी नदी घाट श्रींची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांसह घंटेचा ठणठणाट लक्षवेधी राहिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती मोरया अशा  नामजयघोषात तसेच नाचत, जल्लोषात श्रींचे मूर्तीचे विसर्जन शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदी येथील विसर्जन कुंडात करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मूर्ती दान मोहीम सुरु करण्यात आली असून गणेश भक्त नागरिकांनी मूर्ती दान करण्यास पसंती दिली. येथील इंद्रायणी चे प्रदूषण रोखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी शहरात ठीकठिकाणी विसर्जन कुंड व्यवस्था केली आहे. याच विसर्जन कुंडात श्रींचे विसर्जन करीत आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी नगरपरिषदेचे आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांना समोर आदर्श ठेवला.  

 आळंदी परिसरात इतर गणेश मंडळे आणि नागरिकांनी यातून प्रेरणा घेत गणेशोत्सवाचे विसर्जनाच्या शासनाचे आदेशांचे पालन केले. आळंदी परिसरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होत आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व परिमंडळ तीन अंतर्गत पोलीस स्टेशनच्या वतीने देखील गणेश मंडळांना यासाठी आवाहन करण्यात आले होते. आळंदी परिसरातून परीक्षकांचे देखील उत्साहात स्वागत करण्यात आले होते. आळंदी पोलीस स्टेशन तर्फे श्रींचे मूर्तीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. इंद्रायणी नदी घाट लगत भव्य मिरवणूक आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचेसह पोलीस स्टेशन मध्ये सेवारत महिला, पुरुष अधिकारी, कर्मचारी यांचे हस्ते श्रींची आरती झाल्यावर पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी श्रींची मूर्ती विसर्जन कुंडात जलस्पर्शीत करून आळंदी नगरपरिषद मूर्ती स्वीकार केंद्रात विधिवत सुपूर्द केली. यावेळी पोलीस ठाण्यातील विविध अधिकारी, पुरुष - महिला कर्मचारी, नागरिक, पोलीस मित्र उपस्थित होते. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे नियंत्रणात आळंदीत गणेशोत्सव प्रथा परंपरांचे पालन करीत उत्साहात साजरा होत आहे.  

  आळंदी पोलिस स्टेशन गणेशोत्सवातील श्रींचे विसर्जन हरिनाम नाम जयघोषात उत्साहात मंगलमय वातावरणात झाले. श्रींचे विसर्जन कृत्रिम हौद्यात करण्यात आले. श्रींची मूर्ती पुढील कार्यवाही साठी आळंदी नगरपरिषद मूर्ती संकलन केंद्रात सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांचे सह सर्व पोलिस अधिकारी, महिला, पुरुष कर्मचारी सेवक पारंपरिक वेशभूषा करीत उपस्थित होते.

  आळंदीतील येळवंडे नगर मधील लक्षशांती गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रींचा गणेशोत्सव साजरा होत आहे. उद्योजक सचिनशेठ येळंवडे यांनी गणेश मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांचे हस्ते श्रींची आरती उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासली. परिसरातील रहिवासी नागरिकांनी श्रींचे दर्शनास मोठी गर्दी करून श्रींचे दर्शन घेत कार्यक्रमात सहभाग घेतला.  

Post a Comment

0 Comments