Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी नगरपरिषद मतदार यादी सूचना हरकत दुरुस्तीस अर्जाचा वर्षाव

१७ ऑक्टोबर अंतिम मुदतीत अर्ज करण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन

आळंदी जनहितचे निवडणूक आयोगास साकडे  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काळात प्रस्तावित असल्याने आळंदी नगरपरिषदेने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासन यांचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सूचना हरकती साठी खुल्या केल्या आहेत. यावर मतदार नागरिकांनी मुदतीत सूचना व हरकती देण्यासाठी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आवाहन केले आहे. 

  आळंदी नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर झाल्यावर नगरपरिषदेने वरिष्ठ कार्यालयाचे आदेशा नुसार प्रभाग क्रमांक १ ते १० प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी सूचना हरकती साठी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर नागरिक, मतदार आणि इच्छुक उमेदवार यांनी सूचना, हरकती तसेच नावांतील दोष दुरुस्ती, मतदार यादी आणि मतदार यांचे संदर्भातील हजारो हरकती घेत सूचना व हरकतींचा वर्षाव केला आहे. 

  आळंदी नगरपरिषद येथील प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये मंजूर प्रभाग रचने प्रमाणे त्या त्या प्रभागातील मतदार त्या त्या प्रभागात असावेत अशी मागणी नागरिक, मतदार आणि पदाधिकारी यांचे सह आळंदी जनहित विकासचे वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांचेसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री,  राज्य शासनाकडे केली आहे. आळंदी नगरपरिषद हद्दी मध्ये हद्दी बाहेरील मतदार नगरपरिषद प्रभागात नावे असल्याने दोष विरहित यादी होण्यासाठी प्रशासनाने स्थळ पाहणी करून हद्दी आणि प्रभाग बाहेरील मतदार संबंधित ठिकाणी तात्काळ वर्ग करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. या प्रारूप यादीत आयात मतदार, दुबार मतदार नावे तसेच मयत मतदार नावे असून आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ ते १० मधून कमी करण्याची मागणी सूचना हरकत देत करण्यात आली आहे. यासह मतदार यादीतील चुका दुरुस्ती, टायपिंग दोष दुरुस्त करून अंतिम मतदार यादी बिनचूक प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी नागरिक, मतदार यांचे वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, मुदतीत आलेल्या सूचना हरकती यावर तात्काळ प्रशासकीय कामकाज आणि स्थळ पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांनी मुदतीत अर्ज सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. आता पर्यंत ३ हजारावर सूचना हरकती प्राप्त झाल्या आहेत. १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतीत आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार आहे. मुदती शिवाय आलेल्या हरकतींवर विचार केला जाणार नाही असे हि त्यांनी सांगितले. आलेल्या हरकतीवर प्रशासनाने स्थळ पाहणीसह कामकाज सुरु केले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments