सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
महाविद्यालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ. फारुक सय्यद, विभाग प्रमुख डॉ. एस. एम. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांस वाव देण्या साठी झेरॉन २०२५ संकल्पने अंतर्गत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांद्वारे काव्य सादरीकरण, नृत्य कला, गायन कला, पोवाडा, पथनाट्य अशा विविध कला प्रकाराचे सादरी करण उत्साहात करण्यात आले.
या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागातील सर्व प्राध्यापकांसह प्रथम वर्ष विद्यार्थी संघटना आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाचे संयोजन प्राध्यापक प्रकाश माळी, डॉ. शोभा रुपणार आदींनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यास अनुरूप असे नाविन्यपूर्वक उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर, प्राचार्य फारुक सय्यद यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विशेष कौतुक केले.

Post a Comment
0 Comments