प्रभाग क्र. १० मधील लक्षवेधी उपक्रम
या उपक्रमाला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, दोन दिवस चाललेल्या शिबिरात शेकडो महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समाजघटक आणि राजकीय पक्षांच्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रभाग क्रमांक दहा मधील महत्त्वाच्या चार सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रामशेठ गावडे, पुणे जिल्हा भाजपा सचिव किरण येळवंडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष अमोल विरकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, सचिन गिलबिले, यांच्या शुभहस्ते सुरेश नाना झोंबाडे जनसंपर्क कार्यालय, युनियन बँकेसमोर, पुणे-आळंदी रोड, देहू फाटा, पाण्याच्या टाकीजवळ (डोंगरावरती), काळे कॉलनी, सोपान गायकवाड यांच्या घराशेजारी, काळे कॉलनी आणि सार्वजनिक गणपती मंडळ, काळे कॉलनी, आळंदी इ केवायसी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य नानासाहेब साठे,मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण,
नगरसेवक दिनेश घुले, उद्योजक दीपक काळे, सामाजिक कार्यकर्ते उमेश बिडकर, भानुदास पिसाळ, किसन पारवे,शिवसेना माजी शहर प्रमुख सचिन तापकीर,लघुउद्योजक संघाचे अध्यक्ष सुनील काकडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, मराठवाडा संघटना संतोष हावडे, उद्योजक रामकृष्ण पुंढे, युवा उद्योजक श्रीकांत काकडे, बालाजी शिंदे, भाजपा माजी कार्याध्यक्ष बंडू नाना काळे, विठ्ठल मोरे, माऊलीशेठ गलबे, सामाजिक कार्यकर्ते शहदेव सानप, बाबूलाल काळे, विठ्ठल भोरे,उद्योजक सतीश गुंड, मंगेश काळे, विनोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-KYC प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आलेल्या महिलांची ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. ऑफलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या महिलांना बॅक ऑफिच्या कॉल सेंटरद्वारे ओटीपी घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ई-KYC केल्याने लाडक्या बहिणींना थेट ₹ १,५०० चा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे प्रत्येक बहिणीपर्यंत हा उपक्रम पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”संपूर्ण प्रक्रिया मोफत, पारदर्शक आणि तज्ज्ञ मार्गदर्शनासह पार पडली जाणार असल्याचे आयोजक सुरेश नाना झोंबाडे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले. परिसरातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
.jpeg)

Post a Comment
0 Comments