कोथरुड मतदार संघातील पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर कोथरुड विधानसभा मतदार संघातील पात्र पदवीधर मतदार व शिक्षक मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार, संजय गांधी योजना तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी 210 कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अंजली कुलकर्णी यांनी केले आहे.
कोथरुड मतदार संघाकरीता एकूण 18 मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी नमुना क्र. १९ व पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता नमुना क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहेत.
मतदान केंद्रांसाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोथरुड, पाषाण, बालेवाडी, बाणेर, बहुली कार्यक्षेत्रासाठी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा पोतदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या तहसीलदार श्रीमती अंजली कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. दशभुजापासून नवीन कर्नाटक हायस्कूलकडे जाणारा रस्ता, अष्टविनायक मित्र मंडळाचे मंदीर, छत्रे सभागृहाची मागची बाजू, एरंडवणाचा संपूर्ण भाग या कार्यक्षेत्राकरिता अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे प्रशांत खताळ यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पदवीधर मतदारांना नाव नोंदणीसाठी नमुना क्र. १८ हा http://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शिक्षक मतदारांना नाव नोंदणीकरिता नमुना क्र. १९ उपलब्ध आहे.
नावनोंदणीकरीता इच्छुक शिक्षक व पदवीधर हे पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा २१० कोथरुड विधानसभा मतदार संघ, कर्वे रोड क्षेत्रीय कार्यालय, रेल्वे बुकिंग केंद्राशेजारी, पुणे या ठिकाणी आपला अर्ज दाखल करु शकतात.
तसेच प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी २ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. सदर मतदार याद्यांबाबत दावे व हरकती २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकलव्य शिक्षण संस्था, इंजिनिअरींग इमारत कोथरुड, (सिव्हील डिपार्टमेंट इमारत), श्रीमती रत्नप्रभा मोहिते पाटील विद्यालय, कोथरुड, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय कोथरुड तसेच अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा एरंडवणा या ठिकाणी कार्यालयीन वेळेत दाखल करता येतील, अशी माहिती श्रीमती कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर व शिक्षक मतदरासंघ तथा २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
शिवाजीनगर मतदार संघाकरीता एकूण ९ मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी नमुना क्र. १९ व पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता नमुना क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहेत.
मतदान केंद्रांसाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये दिली आहे.
Post a Comment
0 Comments