सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वरील हल्ल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वकिला कडून सरन्यायाधीशांवर हल्ला होणे हे लोकशाही साठी घातक आणि मारक आहे. वकीलांनी असे गैरप्रकार केले तर न्यायाधीशांनी कोणावर विश्वास ठेवावा. न्याय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकीलाने केलेली ही कृती वकील व्यवसाय आणि सकल वकील वर्गावरील विश्वास उडाल्या सारखी गोष्ट आहे. न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न करणे हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. असे मत लॉयर्स कन्झुमर सोसायटीचे माजी तज्ञ संचालक ॲड. विष्णू तापकीर यांनी व्यक्त केले.या घटनेचा निषेध प्रसंगी त्यांनी या घटनेचा निषेध ही व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वर वकील राकेश किशोर याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध ॲड तापकीर यांचे सह जिल्ह्यातील मान्यवर वकील आणि वकील संघटना, बार असोसिएशन यांनी केला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्स्थान ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ॲड. तापकीर म्हणाले, ही घडलेली घटना निंदनीय आहे. संबंधित वकिलाची सनद तात्काळ रद्द करून त्याचेवर कायदेशीर कारवाई तत्काळ करावी अशी मागणी ही ॲड तापकीर यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केली आहे. ॲड. तापकीर यांचेसह मोठ्या संख्येने वकीलवर्ग यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments