आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी कार्तिकी वारीचे औचित्य साधून दंडवत लीला स्मृती व एकनाथ ग्रंथमाला या ग्रंथाचे प्रकाशन हरिनाम गजरात स्वामी अमृतनाथ मठात ह. भ. प. कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या हस्ते झाले.
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास माधवदास जी महाराज, संतोष आनंद शास्त्रीजी, लोकेश चैतन्य महाराज रामराजे भुवनकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचेसह राज्यातील वारकरी संप्रदायातील उर्धवयू जेष्ठ कीर्तनकार, मान्यवर वारकरी, भाविक उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रंथाचे संशोधक व प्रकाशक धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी यांच्या संप्रदायातील महान कार्या बद्दल बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, संत एकनाथ महाराज, संत नरहरी महाराज, सिद्ध श्रीधर स्वामी, गावोबा महाराज नित्यानंदनाथजी, संत तुकाराम महाराज यात माधव त्रिंबक शाळीग्राम म्हणजे परमहंस दंडवत स्वामी यांच्या सागर चरित्राचा विस्तार लिखित स्वरूपात अभ्यासासाठी तयार करण्यात आलेला आहे. दंडवत स्वामींची परंपरा श्री केशव महाराज, नारायण महाराज, व्यंकट महाराज, रामचंद्र महाराज, धर्मदेव महाराज, शाहू देव महाराज, त्रिंबकनाथ देव, आनंद बाबा व विद्यमान अमृत आश्रम स्वामी सद्यस्थितीला वर्तमान काळात हे कार्य करत आहेत. चैतन्य महाराज पुढे बोलताना म्हणाले, आपल्या भारतीय संत महात्म्यांच्या गुरु शिष्य परंपरा समाजाला माहीत होणे. हि काळाची गरज आहे. या ग्रंथ चरित्र वाचनाने मानवाचे चारित्र्य व्यवस्थित होते. देवाला देवाच्या चरित्रा पेक्षा संतांचे गुणांनुवाद जास्त आवडतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

.jpeg)
Post a Comment
0 Comments