गोपाळपुर मारुती देवस्थानात श्री पांडुरंगरायांचा सोहळा विसावणार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अलंकापुरीतील माऊलींचे मंदिराच्या महाद्वार प्रवेशद्वारात श्रीगुरू हैबतरावबाबांच्या पायरी पूजनाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास कार्तिकी यात्रेतील वार्षिक उत्सवा अंतर्गत उद्या बुधवारी ( दि.१२ ) पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे. अशी माहिती माउलींच्या पालखी सोहळ्याचे मालक ह्.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर,आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
माऊलींचे संजीवन समाधी दिन सोहळ्यातील श्री गुरुहैबतराव बाबा पायरी पूजन,त त्पूर्वी श्रीना पवमान अभिषेख, दुधारती, भाविकांचे महापूजा, महानैवेद्य, श्रींचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा, विना मंडपात परंपरेने योगीराज ठाकूर व बाबासाहेब आजरेकर यांचे वतीने कीर्तन सेवा, धुपारती तसेच हैबतरावबाबा पायरीपुढे ह.भ.प.वास्कर महाराज, मारुतीबुवा कराडकर, हैबतराव आरफळकर यांचे वतीने परंपरेने जागर सेवा होणार आहे.
सोहळ्यात पहाटे नैमित्तिक घंटानाद, पवमान अभिषेक, पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर,बाळासाहेब आरफळकर व आरफळकर परिवार यांचे हस्ते श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन धार्मिक मंगलमय वातावरणात होणार आहे. या प्रसंगी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, आळंदी पालिका, प्रशासन, महसूल, पोलीस प्रशासन तसेच श्रीचे मानकरी, सेवक,नागरिक आणि भाविक उपस्थित रहाणार आहेत. श्रींचे पुजारी वेदमंत्रोच्चारात पायरी पूजन धार्मिक विधी करणार आहे. कार्तिकी यात्रेस राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. यामुळे अलंकापुरीत भक्तिरसाला उधाण आलेले सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. श्रीगुरू हैबतरावबाबांची पुण्यतिथी असल्याने मंदिरातील हैबतबाबा ओवरीत पूजा केली केली जाणार आहे. हैबतबाबांची दिंडीची मंदिर व नगरप्रदक्षिणा होईल. भाविक आळंदीत दाखल झाल्याने अलंकापुरी भक्तिरसात चिंब होताना भाविक अनुभवतात. दरम्यान माउलींच्या चल पादुकावर भक्तां कडून महापूजा देखील होणार आहेत. मंदिरात श्रीचे दर्शनास भाविकांची गर्दी होत आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रती भाविकांच्या साठी उपलब्द्ध केल्या असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
यात्रेत आळंदी साठी पीएमपीएमएल तसेच एस.टी. च्या वतीने जास्त बसेस सोडल्या जातात. मात्र यात्रे तील तिकीट दर वाढ न करता भाविकांना सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने सल्लागार बाळासाहेब पेटकर , अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी केली आहे. प्रवासी दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये. राज्य परिवहन सेवा आणि पुणे पीएमपीएमएल च्या वतीने कार्तिकी यात्रा काळात भाविकांना जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यात रात्री देखील गरजेनुसार बससेवा पुरविण्यात येणार आहेत.या बसगाड्या स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आदी स्थानकां वरून सुटतील.ही सेवा रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.रात्री १० नंतर नियमित तिकीट दरांपेक्षा जास्त दर आकारणी करू नये अशी मागणी भाविकांतून जोर धरत आहे. भाविकांना सुट्टे पैशामुळे गैरसोय होणार नाही. यासाठी यात्रा नियोजनात दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यात्रा काळात श्रीचे देवदर्शनास आलेल्या वारकरी-भाविक आणि नागरिक यांचे सेवा सुविधांना तसेच सुरक्षेस प्राधान्य देत आळंदी देवस्थानने प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ साहेब, व विश्वस्त मंडळाचे नियंत्रणात तयारी केली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
माउली मंदिरात विविध सेवांसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. दर्शनबारीतील वृद्ध आणि अपंगांसाठी फायबरची शौचालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय नवीन दर्शनबारीत देखील भाविकांना विविध सेवा आणि सुलभ दर्शन होईल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने सुलभ शौचालये, पिण्याचे पाणी, संरक्षित कठडे, कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे सुरक्षित दर्शन होईल असे नियोजन झाले आहे.
देवस्थानने वॉकी टॉकी वापर, मंदिर व दर्शनबारीत अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिरात धातुशोधक यंत्रणा बसविण्यात येत आहे. यात्रा काळात भाविकांना मंदिरात कोणतीही चीजवस्तू अथवा सामान सोबत नेता येणार नाही. वारीसाठी देवस्थानने सर्व विश्वस्तांच्या तसेच पुणे जिल्हा प्रशासनाचे सूचना प्रमाणे नियोजन केल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. कार्तिकी वारीच्या तयारी बाबत माहिती देताना वीर यांनी सांगितले,की देवस्थानकडून वारीची तयारी अंतिम झाली आहे.
इंद्रायणी काठच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील दर्शनबारी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दर्शनबारीत भाविकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत चहा आणि नाश्टा देण्यात येणार आहे. याच बरोबर रांगेतील भाविकांना पिण्याच्या पाण्याची तीरावर भाविकांना माउलींच्या समाधीचे दर्शन घेता यावे यासाठी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. मंदिर सुरक्षेसाठी देवस्थानने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. या शिवाय यात्रा काळात राज्यातून वाढीव पोलिसांची कुमकही तैनात झाली आहे. भाविकांना मंदिराच्या नवीन दर्शनबारीतून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तर बाहेर पडण्यासाठी महाद्वाराचा वापर केला जाणार आहे. भक्त निवास आणि दर्शनबारीत भाविकांसाठी बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्था प्रभावी रहाणार असल्याचे डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
आळंदी मंदिर स्वच्छतेसाठी देवस्थानने स्वकाम सेवा मंडळ, विश्व सामाजिक सेवा संस्था, आर्ट ऑफ लिविंग पथक अशा सामाजिक संस्थांकडून सेवक कार्यकर्ते नेमले आहेत. लाडू प्रसादाचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. भाविकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण (आरओ) यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
आळंदीला जोडणाऱ्या फुलगाव आळंदी या रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे, धुळीचे साम्राज्याने भाविक त्रस्त झाले.आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाढते खड्डे आणि धुळीचे प्रमाण भाविकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. अनेक नागरिक, भाविक,वयोवृद्ध रुग्ण,बालके यांचे पासून वाहने जात असताना उडणारा धुराळा मार्गावरून ये-जा करताना प्रचंड धुळीचे त्रासास सामोरे जावे लागत आहे. यातून भाविक-नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. मात्र आळंदीतील रस्ते सिमेंटीकरणाने भाविकांतून समाधान आहे.आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. नदी वरील पूल आणि बंधार्याचे कडेने संरक्षक जाळी लावण्यात आली असून भाविकांचे सुरक्षेला यात प्राधान्य दिले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. माऊली मंदिर तसेच आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर श्रींचे शिखरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई ने मंदिर परिसर आणि नदी घाटावर आळंदी देहू परिसर विकास समिती यांचे तर्फे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
श्री पांडुरंगराय पालखी सोहळा गोपाळपुरातील मारुती मंदिर देवस्थानात मुक्कामी रहाणार
श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे आगमन होणार असून यावर्षी श्रींचा वैभवी पालखी सोहळा गोपाळपुरातील श्री मारुती मंदिर देवस्थान येथे विसावणार असल्याचे अप्पा महाराज मोरे यांनी सांगितले. देवस्थान तर्फे तयारीचा आढावा घेण्यात आला असून प्रशस्त मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. श्रींचे सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत करण्यात येत असल्याचे मोरे महाराज यांनी सांगितले. भाविक, वारकरी आणि नागरिकांची श्रींचे दर्शनास होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन गोपाळपूर येथील मारुती देवस्थानचे प्रशस्त जागेत सोहळा विसावणार असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

Post a Comment
0 Comments