Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांची गैरसोय टाळण्यास प्राधान्य

यात्रा आणि निवडणूक प्रशासनाची तारेवरची कसरत     



आळंदी ( ज्ञानेश्वर घुंडरे पाटील ) : तीर्थक्षेत्र आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा १२ ते २०  नोव्हेंबर या काळात होत असून कार्तिकी यात्रा अंतर्गत माउलींचा संजीवन समाधी सोहळा होत आहे. यात अधिकची भर आळंदीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता सुरु आहे. स्थानिक प्रशासनाची कार्तिकी यात्रा आणि निवडणूक तयारी अशी दोन्ही आघाड्यावर कामकाज करण्याची लगबग सुरु असून तयारीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आळंदी नगरपरिषद, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी यांचे वतीने आपापल्या स्तरावर नागरी सेवा सुविधांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे.   

  आळंदी नगरपरिषद प्रशासन पायाभूत सुविधांसाठी कामकाज करीत आहे. वारकरी, भाविक नागरिक यांच्या सोयीसाठी कार्यरत आहे. दर्शनबारी व्यवस्था नेहमी प्रमाणे तात्पुरती करण्यात आली आहे. भाविकांचे सुविधेसाठी शौचालय ८००, पाणी टँकर १९ , दर्शन बारी व इतर ठिकाणी १८० सीसीटिव्ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. अतिक्रमण पथक, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग यांचे माध्यमातून पावडर फवारणी, साफ सफाई करण्यात येत आहे. 

 रथोत्सवाच्या काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे अतिरिक्त रोषणाईची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीसाठी जागेचे अधिग्रहण करण्याचे आदेश हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी यापूर्वीच दिल्याने संबंधित ठिकाणी दर्शनबारी मंडप उभारण्यात आला आहे. सुरक्षेसाठी टेहळणी साठी वॉच टॉवर, भाविकांसाठी स्वच्छतेची सोय तैनात करण्यात आली आहे. नगरपरिषदे मार्फत अनुक्रमे एक हजार प्रसाधनगृहे बसविण्यात येत असून पाणी पुरवठ्यासाठी ५ फिलिंग पॉइंट्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. आरोग्य विभागा कडून आळंदी ग्रामीण रुग्णालयात २४ तास सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने 

 आळंदी यात्रा काळास मोठा बंदोबस्त तैनात असून यात १५० अधिकारी, ९००  अंमलदार आणि ५०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, एस आर पि २ तुकडी तैनात होत आहेत. महावितरण विभागाने यात्रा काळात अखंड विद्युत पुरवठा साठी देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत.

Post a Comment

0 Comments