Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत पोलिसांचा शांततेसाठी रूट मार्च उत्साहात

 निवडणुकीचे पार्श्वभूमीवर आळंदीत रूट मार्च 



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील आळंदीत पोलिसांनी शांततेसाठी रूट मार्च काढला.  

  आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेम्बर रोजी होत आहे. त्या नंतर ३ डिसेम्बर रोजी लगेच मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असून २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत उमेदवार यांना चिन्ह  वाटप होणार आहे. या नंतर प्रचार अधिक प्रभावी पणे सुरु होणार आहे. 

  निवडणुकीचे पार्श्वभूमीवर आळंदीत सकाळी साडे दहाचे सुमारास रूट मार्च सुरु झाला. यात सहा. पोलिस आयुक्त, चाकण विभाग सचिन कदम यांची प्रमूख उपस्थिती होती. आळंदी शहरातून आळंदी पोलिस स्टेशन - नगरपरिषद चौक - पीसीएमटी चौक - वाय जंक्शन - देहूफाटा - चाकण चौक - केळगाव चौक - घुंडरे आळी चौक - वडगाव चौक - मरकळ  चौक - विठ्ठल रुक्मिणी चौक - पोलिस स्टेशन या मार्गावर आळंदी व दिघी पोलीस स्टेशन हद्दी मधे रूट मार्च झाला. रूट मार्च मध्ये एसीपी १,  वपोनी २ , सपोनि / पोउपनि - २०, अंमलदार १०५ , आरसीपी पथक १ सहभागी झाले होते. अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदी अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments