‘विद्यार्थी समूह’ उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय प्रेस दिनाचे आयोजन
‘समाज माध्यम व प्रसिद्धी समूह’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ‘प्रेस दिन’ उपक्रम राबविण्यात आला. आला. अध्यक्षस्थानी सहशिक्षक समाधान मादक होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अर्जुन मेदनकर, संदीप रंधवे, रोहिदास कदम, हमीद शेख, कृष्णाजी डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संदीप रंधवे म्हणाले, विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा कसा वापर करावा या विषयी मार्गदर्शन केले. अवांतर वाचनाची सवय लावावी असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी प्रेस दिना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाज माध्यमे ही मनोरंजना बरोबरच आपल्याला व्यवसायिक करिअरच्या संधी उपलब्ध करून देतात. अलीकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती टिकावी. यासाठी मुलांनी शालेय ग्रंथालयांचा वापर करून आपले ज्ञान अधिक प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्न करावा. नवं समाज निर्मितीसाठी वृत्तपत्रांचे महत्त्व आणि योगदान मोठे असल्याने मुलांनी वृत्तपत्र देखील वाचावीत असे आवाहन त्यांनी करत मुलांना प्रेस दिना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोहिदास कदम यांनी सोशल मीडियाच्या वापरावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, फेसबुक, ट्विटर, वॉट्स अँप , इन्स्ट्राग्राम युट्युब, रील्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजचा विद्यार्थी हा भरकटला जाऊ नये. सोशल मीडिया माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आणि गरजेच्या वेळी करावा असे सांगून गुण दोष यावर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या वेळी श्रीम्. के.एन. देवकर, जी.पी.पालवे, समाधान आदक यांनी मार्गदर्शन केले. आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्या विषयी माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन श्रीम्. के.एन. देवकर यांनी केले. आभार जी. पी. पालवे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments