संविधान उद्देशिकेचे वारकरी, भाविक, नागरिकांना वाटप
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक विश्वकर्मा महाराज पांचाळ, जेष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, मुख्य संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, कैवल्य टोपे, विश्वभर शिंदे, पत्रकार गौतम पाटोळे यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक, भाविक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करीत उद्देशिकेच्या कॉन्शिल्स पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तुकाराम महाराज ताजणे, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात करीत उपस्थित भाविक, नागरिक, वारकरी यांना इंद्रायणी नदी घाटावर संविधान उद्देशिकेचे वाटप करीत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा गौरव करीत जीवन चरित्रावर तुकाराम महाराज ताजणे, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आळंदी जनहित फॉउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड अध्यक्ष संदेश नवले, पिंपरी चिंचवड शहर संदेश नवले सोशल फाउंडेशन अध्यक्ष प्रतीक नवले, विश्वम्भर शिंदे यांनी परिश्रम घेतले. आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले.
तक्षशिला बुद्ध विहार येथे संविधान दिना निमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले. बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पठण झाले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान दिना निमित्त आयु. नामदेव सुरपल्लीकर, आनंद रणदिवे यांनी संविधान मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व, संविधान निर्मितीतील बहुमूल्य योगदान यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी तक्षशिला बुद्ध विहार समिती प्रमुख विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब भोसले, प्रविण रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, श्रेयस रणदिवे, महेंद्र रंधवे, रोहित थोरात, दिलीप वहिले, विलास रणपिसे, चारुदत्त रंधवे आदी उपस्थित होते. आळंदीत विविध सेवाभावी संस्था, मान्यवर पदाधिकारी यांनी परिसरात संविधान उद्देशिकेचे वाटप करीत संविधान दिनी संविधानाचा जागर केला.
फुलगाव येथे १३ डिसेंबर रोजी मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री. सत्यसाई सेवा संघटना पुणे, महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने भगवान श्री. सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिना निमित्त फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा येथे शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी १०१ मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती, फुलगाव समिती प्रमुख सुनिल वागस्कर यांनी दिली.
श्री.सत्यसाई संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य, जिल्हाप्रमुख, कॅप्टन गिरीश लेले, सामुहिक विवाह सोहळ्याचे संयोजक बाळासाहेब वाल्हेकर, व्यंकटेश जालगी, सुनिल वागस्कर, शंकर वागस्कर, नितीश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शना खाली सामुहिक विवाह सोहळ्याचे नियोजन सुरू झाले आहे.
श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून भगवान श्री.सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त सर्व जातीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या नागरीकांचा वेळ, श्रम व आर्थीक बचत होईल. भगवान श्री.सत्यसाई बाबांच्या पवित्र आशीर्वादाने १०१ प्रेमळ जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा करण्याचा श्री.सत्यसाई सेवा संघटनेचा मानस आहे.
श्री.सत्यसाई संघटनेचे सर्व पदाधिकारी सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
सामुदायीक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधुसाठी सोन्याचे मनी मंगळसुत्र,चांदीची जोडवी शालु व चप्पल, वरासाठी सफारी सुट,संसारासाठी लागणारी भांडी,हार, बाशिंग व होमाचे साहित्य मोफत दिले जाईल. सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी फुलगाव समिती प्रमुख सुनिल वागस्कर भ्रमणध्वनी क्रमांक८८३०७२७१८१. फुलगाव समिती सेवादल प्रमुख शंकर वागस्कर भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३८५५८८१ यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpeg)

Post a Comment
0 Comments