आळंदी नगरपरिषद निवडणूक २०२५ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अनेक अर्ज मागे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील नगरपरिषद निवडणुकीच्या माघारी अर्ज घेण्याचे मुदतीत अनेक उमेदवारांनी माघारी अर्ज घेत निवडणुकीचे रिंगणातून माघारी घेत अधिक चुरशी साठी डाव टाकला. आळंदी नगरपरिषद निवडणूक रिंगणातून पळ काढत राजकीय हालचालींना वेग दिला. यात नगराध्यक्ष पदाचे पाच आणि सदस्य पदासाठी ४६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. अनेकांनी माघारी घेतल्याने आळंदीत चुरस वाढली आहे. यातील प्रभाग ८ अ मधून भाजपच्या सुजाता तापकीर या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. माघारी मुळे दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी प्रभागात बहुरंगी सामना रंगणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी आळंदीत चार उमेदवार असून यात भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे, अपक्ष सुरेश दौण्डकर, उमेश डरपे यांच्यात सामना रंगणार आहे. माघारी घेतलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यात घुंडरे तुषार, चोरडिया सतिश, चौधरी राजाराम, तापकीर ज्ञानेश्वर, येळवंडे किरण यांचा समावेश आहे. तसेच दहा प्रभागांमध्ये माघार घेतलेल्या उमेदवारांत प्रभाग १ अ मधून कवितके लक्ष्मीबाई, घुंडरे प्राजक्ता, प्रभाग १ ब मधून घुंडरे सुनील, प्रभाग २ अ मध्ये ऋतुजा रंधवे, ज्ञानेश्वरी उमरगेकर, सुजाता रंधवे यांचा समावेश आहे. प्रभाग २ ब मधून भोसले अभिषेक, भोसले संतोष, सय्यद निसार यांचा समावेश आहे. प्रभाग ३ अ मधून कुऱ्हाडे वंदना, वाघमारे अभिलाषा, शिर्के किरण, शिर्के वैशाली यांचा समावेश आहे. प्रभाग ४ अ मधून पाचुंदे पूजा, पांचाळ आश्विनी, प्रभाग ४ ब मधून कुऱ्हाडे मनोज, गायकवाड गौरव, येळवंडे किरण, वहिले राजेश, सचिन सोलंकर, प्रभाग ५ अ मधून कुऱ्हाडे अक्षदा, बोरुंदिया शिल्पा, प्रभाग ५ ब मधून बनसोडे ज्ञानेश्वर यांचा समावेश आहे. प्रभाग ६ अ मधून कुऱ्हाडे तृप्ती, पोफळे मोक्षदा, प्रभाग ६ ब मधून कुऱ्हाडे समिर, गोगावले रमेश यांचा समावेश आहे. प्रभाग ७ अ घुंडरे ज्योती, तुर्की शांभवी, प्रभाग ७ ब मधून घुंडरे विवेक यांचा समावेश आहे. प्रभाग ८ ब मधून गिलबिले चैत्राली, बोत्रे सविता, रहाणे प्रमिला यांचा समावेश आहे. प्रभाग ९ अ तापकीर नम्रता, तापकीर पुजा, तापकीर सीमा, शिंदे कन्याकुमारी यांचा समावेश आहे. प्रभाग ९ ब बवले गुरुनाथ यांचा समावेश आहे. प्रभाग १० अ मधून वेळकर मंगला यांचा समावेश आहे. प्रभाग १० ब काळे उज्वला यांचा समावेश आहे. प्रभाग १० क मधून काळे प्रज्ञा, काळे सुवर्णा, चोरडिया माधवी, तापकीर सोनाली, तापकीर आरती, लांडगे शोभा यांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांचे उमेदवार पक्ष चिन्ह असल्याने प्रचार सुरु केला असून अपक्ष उमेदवारांना प्रचारास सुरुवात केली असली तरी चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर ला मिळणार आहे. चिन्ह मिळाल्या नंतर अगदी चार दिवसांत प्रचार करण्यास अल्प वेळ मिळणार आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments