आळंदीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदारांना आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीर्थक्षेत्र आळंदीचे विकासास गती देण्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाची ग्वाही देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे यांचेसह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस ला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचे प्रचारार्थ आळंदीत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्ष संघटनेतील पदाधिकारी, उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आळंदीतील विविध विकास कामांचा आढावा घेत अधिकचे विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आळंदीचे सर्वांगीण विकासाची ग्वाही देत मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आळंदी असून येथे लाखो भाविक देवदर्शनास येत असतात. विकास हा काही कोणाचे बोलण्यातून होत नाही. त्यासाठी कामे हि करावी लागतात. बारामती, पिंपरी चिंचवड येथील विकास कामे केली. त्याच प्रमाणे आळंदीचा हि विकास केला जाईल. यावेळी त्यांनी राज्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत मी पुण्याचा पालकमंत्री आहे. येथील भागाचे विकास कामांसाठी नागपूर, ठाण्याचे पेक्षा मी जवळाचा आहे. पुणे जिल्ह्याचे विकास कामास प्राधान्य देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे योग्य नेतृत्व, सक्षम अनुभव व्यक्तिमत्व असून त्यांचे घराण्याने देखील आळंदीचे विकास कामात मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सेवा सुविधांची कामे करताना प्राधान्याने पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक नियोजनाचे प्रश्न सोडविले जातील. इंद्रायणी नदी विकास, मंदिर परिसराचा विकास करताना येथील व्यापारी, स्थानिकांना विश्वासात घेऊन विकासकामे केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

Social Plugin