Type Here to Get Search Results !

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची आळंदी मंदिरास भेट दर्शन


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सद्दिच्छा भेट दिली. गीता जयंती निमित्त वेदश्री तपोवन येथे एका कार्यक्रमा निमित्त ते आळंदी समीप आले होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या सद्दिच्छा भेटीत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेतले. 

  राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी समाधी समोर पूजा करीत मनोभावे श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब,विश्वस्त ॲड. राजेंद्रजी  उमाप, आळंदीतील राष्ट्रीय युवा कीर्तनकार विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त ॲड. रोहिणीताई पवार उपस्थित होते. यावेळी देवस्थान तर्फे त्यांनी स्वागत करीत संवाद साधून देवस्थान चे कामकाजाची माहिती दिली. 

  आळंदीत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून या दरम्यान प्रचाराचा शेवटचा दिवस आणि राज्यपाल यांची आळंदी मंदिरास सद्दिच्छा भेट तसेच एकादशी असल्याने मंदिर परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आळंदीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे यांचेसह नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे प्रचारार्थ सभा झाली. सभा झाल्यावर त्यांनी मंदिरात न जाता श्रींचे महाद्वारातून दर्शन घेत पुढील प्रचार दौऱ्यास जाणे पसंत केले.

Post a Comment

0 Comments