Type Here to Get Search Results !

Alandi अलंकापुरीत सफला एकादशी दिनी इंद्रायणी आरती भाविकांची गर्दी

इंद्रायणी काठावर आरती कोनशिलेचे लोकार्पण ; मंदिरात पुष्प सजावट   

 

 








आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात सफला  एकादशी दिनी श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. भाविकांनी श्रींचे दर्शनासह इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरतीस गर्दी केली. तत्पूर्वी दिंडी माऊली मंदिरातून नदी घाटावर हरिनाम गजरात आणण्यात आली. एकादशी निमित्त वारकरी भाविकांनी आळंदीत ग्राम प्रदक्षिणा करीत हरिनाम गजर केला.   

  आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, रोहीणी पवार, राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, देहू संस्थान अध्यक्ष बापुसाहेब मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थान विश्वस्त माधवी निगडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी भाविक, महीला पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी विश्वस्त रोहिणी पवार, निलेश महाराज लोंढे यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी आरती उपक्रमासाठी राम महाराज झिंजुर्के यांनी एक लाख रुपये देणगी आळंदी संस्थान ला दिली.

  आळंदीत इंद्रायणी आरती कोनशीलेचे लोकार्पण उत्साहात 

इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने नित्य नैमित्तीक एकादशी दिनी इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा वारकरी सेवा महामंडळ अध्यक्ष विलास तात्या बालवाडकर यांचे हस्ते इंद्रायणी आरतीचे कोनशीलेचे पूजन पुष्पहार अर्पण करीत लोकार्पण करण्यात आले. सौरभ शिंदे, संयोजक राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, महादेव पाखरे रोहिदास कदम, बाबासाहेब भंडारे, भागवत शेजूळ, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत, नीलम कुरधोंडकर, अलका परदेशी, काशीबाई आडकणे, जयश्री भागवत, सुनिता निळे, सुरेखा कुऱ्हाडे, सखुबाई मुंडे, सरस्वती भागवत, लता वर्तले, पुष्पा लेंडगर, कौशल्या देवरे, सुरेखा काळभोर, मयुरी कदम, सुवर्णा काळे, मेघा काळे, संगीता चव्हाण, ज्ञानेश्वर घुंडरे, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

  आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात एकादशी निमित्त महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम  प्रसाद, महानैवेद्य झाला. इंद्रायणी नदी घाटावर मारुतीबुवा गुरव यांचे वतीने त्यांचे वंशज संकेत वाघमारे यांचे नियंत्रणात कीर्तन सेवा रुजू झाली. इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती आणि इंद्रायणी आरती कोनशीलेचे लोकार्पण पुष्पहार अर्पण करून विलास तात्या बालवाडकर यांचे हस्ते झाले. एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात यावेळी आळंदी देवस्थान तर्फे देखील हरिनाम गजर वेदमंत्र जयघोषात उत्साहात करण्यात आली. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, व्यवस्थापक, सेवक, कर्मचारी, भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने नदी घाटावर इंद्रायणी आरती इव्हेन्ट साजरा करून आरती करण्यात आली.   

   तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती सेवा समिती, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.     

Post a Comment

0 Comments