भामा आसखेड कुरुळी प्रकल्पात देखभाल दुरुस्तीचा परिणाम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भामा आसखेड कुरुळी प्रकल्प येथील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार ( दि. १७ ) रात्री साडे अकरा पासून ते गुरुवार ( दि. १८ ) रात्री दहा वाजे पर्यंत आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा केंद्रास भामा आसखेड कुरळी प्रकल्प येथून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
या संदर्भात भामा आसखेड कुरुळी प्रकल्प कार्यकारी अभियंता यांनी नगरपरिषदेस कळविले असून कुरळी प्रकल्पात विविध देखभाल दुरुस्तीची विकास कामे केली जाणार आहेत. यामुळे आळंदी शहराला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कुरुळी प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्या नंतर आळंदी नगर परिषदेस पाणी पुरवठा शुक्रवारी ( दि. १९ ) नियोजित वेळे नुसार नागरिकांना पूर्ववत पाणी पुरवठा सुरु होईल. असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.
पर्यायी व्यवस्था करण्यास उपाय योजनेची मागणी
आळंदी शहरास दोन, तीन दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. विविध देखभाल दुरुस्तीचे कामांमुळे अनेक वेळा आळंदीस भामा आसखेड कुरुळी प्रकल्प येथून पाणी पुरवठा बंद केला जातो. ज्या दिवशी आळंदीस भामा आसखेड प्रकल्प येथून पाणी पुरवठा होत नाही. याचा परिणाम आळंदीतील पाणी पुरवठ्यावर होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी पाणी पुरवठा यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. यासाठी आळंदीतील पर्यायी जल स्रोत संवर्धन करून पर्याय उप्लब करून देण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे. या साठी आळंदीतील सार्वजनिक विंधन विहिरी यांची देखभाल दुरुस्ती करून वापरा योग्य यंत्रणा विकसित करण्याची मागणी होत आहे. सुमारे ५० वर सार्वजनिक विंधन विहिरी नगरपरिषदेने वापरा योग्य करून सार्वजनिक वापरास खुल्या करणे आवश्यक आहे. अनेक विंधन विहिरी केवळ देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहेत. तसेच ज्या दिवशी शहरास पाणी येणार नाही. त्या त्या दिवशी विंधन विहिरींसह शहरात १० प्रभागात थेट टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रभाग निहाय पाण्याचे टँकर तीर्थक्षेत्र आळंदी पाणी पुरवठा करण्यास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह आळंदी यात्रा अनुदानातून थेट टँकर खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या साठी पुणे विभागीय आयुक्त यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे निधीतून तीर्थक्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूर अशा विविध ठिकाणी टँकर उपलब्ध करून पर्यायी व्यवस्था भाविक, नागरिकांसाठी विकसित करावी. अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे. पर्यायी व्यवस्थे संदर्भात देखील आळंदी नगरपरिषदेने नागरिकांना आश्वस्त करून पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक भाडेकरू कामगार, नागरिकांचे घरी पाणी साठवण क्षमता फारशी नसल्याने या अडचणींचा देखील नियोजनात प्रशासनाने विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने विविध ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी केंद्रे विकसित करण्यात आली होती. मात्र माउली मंदिर परिसरातील दोन ठिकाणचे पाणी पुरवठा सेवा सुविधा बंद करण्यात आली आहे. आळंदी देवस्थानने नैतिक जबाबदारीतून पाच ठिकाणी सेवा सुविधा निर्माण करण्याचा ठराव करून कामकाज सुरु केले. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी पाणी पुरवठा सुविधा केंद्र बंद असल्याने भाविक, नागरिकांतून देखील नाराजी व्यक्त होत आहे. माउली मंदिर परिसरातील तसेच शहरातील इतर ठिकाणी पाणी पुरवठा सुविधा पूर्ववत सुरु करण्याची मागणी देखील होत आहे.
%20(1).jpg)
.png)
Post a Comment
0 Comments