संघटनेच्या मागणीला संवादातून यश
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शहरातील पथविक्रेत्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या वतीने संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनात पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे समवेत चर्चा करून सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, राज्य शासनाने वेळोवेळी पथविक्रेत्यां साठी केलेलया कायद्या प्रमाणे संरक्षण करण्याची मागणी केली.
यावेळी कायद्या प्रमाणे न्याय मिळावा अशी आग्रही मागणी आणि खंबीर भूमिका पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी मांडली. कायद्याच्या माध्यमातून मागणी करीत प्रथम पथविक्रेत्यांना योग्य ठिकाणी जागा देऊन इतर विकास कामे करण्याची मागणी केली. सद्या भाजी मंडईतील चौपाल सह आळंदी ग्रामीण रुग्णालय परिसरात बसवली आहे. ३५ ते ४० भाजी मंडई स्टॉल धारक यानाचे पर्यायी जागेत पुनर्वसन केल्या शिवाय कुठेही लोखंडी गेट बसवून मनमानी करू नये अशी मागणी त्यांनी केली.
दिलेल्या निवेदनाची योग्य दखल न घेतली गेल्यास संघटनेच्या वतीने आळंदी नगरपरिषदे समोर लक्षवेधी बोंब मारो आंदोलन केले जाईल असा खणखणीत इशारा या वेळी देण्यात आला. आधी पुनर्वसन करा अशी मागणी विक्रेते यांचे वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे समवेत चर्चा करून निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालय, केंद्र व राज्य शासन, पथ विक्रेत्याचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि पथविक्रेता हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तो स्वावलंबी होण्यासाठी अनेक योजना देऊन पथविक्रेता अधिनियम २०१४ हा कायदा त्यांच्या संरक्षणासाठी केलेला असल्याचे यावेळी सांगत मुख्याधिकारी खांडेकर यांचे बरोबर सकारात्मक संवाद साधण्यात आला. विकास कामासाठी बाधित होत असणाऱ्या पथ विक्रेत्यांना योग्य ठिकाणी पर्याय न दिल्यास कोणतेही विकास काम होऊ देणार नसल्याचे या वेळी विक्रेते बांधवानी सांगितले. भगवानराव वैराट यांचे कार्यकर्त्यांनी भाजी मंडईत जल्लोष करत घोषणा दिल्या. शिष्ट मंडळात पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, सचिन काळे, निलेश ठोकणे, गजानन मिटकरी, नवनाथ बोडरे, राहुल रायबोले, नवनाथ तिडके, ऋषिकेश मुंडे, नितीन भुजबळ, नारायण वाघमारे, तुकाराम बोडरे, महाजन बाबा, श्रीधर कलाटे, साबळे महाराज, दिघे पाटील यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments