परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांचे बैठकीत आवाहन
या समन्वय बैठकीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी उपस्थित मान्यवर यांचेशी सुसंवाद साधून मते जाणून घेत नियोजन पूर्व आढावा घेत संवाद साधला, या बैठकीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी साहेब, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अजय पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, शांतता कमेटी पदाधिकारी डी.डी.भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे पाटील, उत्तमशेठ गोगावले, अर्जुन मेदनकर, शाम पवार, रोहिदास कदम, राजेंद्र कांबळे, बाळासाहेब शेंडगे, राजेंद्र पाटील, महेंद्र फणसे, मिलिंद कुलकर्णी, देवेंद्र देशपांडे, पूनम मागु, पूजा वर्पे, रोहित बोरुडे, प्रिया तांदळे, प्रकाश गव्हाणे, त्रिंबक कुलकर्णी, शौकत शेख, गणेश काळजे, प्रणव शेडगे, बाजीराव बनकर पाटील, सचिन गावडे, प्रमोद ताजणे, सिद्धेश्वर ताजणे, अजित गावडे, महादेव पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संवाद बैठकीत आळंदी पंचक्रोशीतील वाहतुकीचा आढावा घेत या पुढील काळात इंद्रायणी नदी वरील पुलाचे कामा मुळे पूल बंद रहाणार आहे. याचा विचार करीत उपस्थितांशी चर्चा करीत पुढील काळात पुलाचे काम होई पर्यंत रहदारी सुरळीत, सुरक्षित करण्यासाठी उपाय योजना जाणून घेण्यात आल्या. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणारे देवदर्शनार्थी, लग्न समारंभ, परिसरातील औद्योगिक परिसरातील रहदारी यात कामगार बसेस, नागरिकांची वर्दळ, कंपन्यांचे कडे माल घेऊन येणारी अवजड वाहने यावर चर्चा करण्यात आली. पुढील काळात पुलाचे काम प्रभावी पणे आणि लवकर पूर्ण करणास देखील सूचना करण्यात आली. लगतच्या गावांतील रस्ते लहान मोठ्या गाड्या यांचा विचार करून आळंदी मरकळ रस्तावरील खड्डे भरण्यास गती देऊन रहदारीला अडथळा ठरणार नाही. याची दक्षता घेण्याचे सूचना करण्यात आल्या. आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यांचे लगतचे गावांतील तसेच आळंदीत अवजड वाहने न प्रवेशता पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी यावेळी केले. या साठी स्थानिक नागरिक, संस्था, पदाधिकारी, वाहतूक पोलीस यांनी आप आपल्या स्तरावरून सोशल मीडियाचे माध्यमातून जनजागृतीचे आवाहन करण्यात आले.
या वेळी विविध मान्यवरांनी चर्चेत भाग घेत रहदारी सुरळीत करण्यासाठी उपाय योजना सुचविल्या. या रहदारी योग्य रस्ते खड्डे मुक्त असावेत, आळंदीतील भाविक, वारकरी, लग्नाची वाहने यांची पार्किंग व्यवस्था, प्रदक्षिणा मार्गावर या दरम्यान वाहने उभी रहाणार नाहीत याची दक्षता घेणे, जनजागृतीसाठी दिशा मार्ग दर्शक फलक लावणे, मुकट ख्य यावेळी पर्याय उरण या दोन गावांना चरोली खुर्द आणि चारली बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या समन्वयक बैठकीत पंचक्रोशीतील कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी आळंदी धानोरे सर्वे बुद्रुक सरवली खुर्द मरखळ सोळू या भागातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये
आळंदी लगतच्या गावांतील शिव रस्ते, अर्धवट कामांचे रस्ते, भूसंपादित रस्ते विकास, इंद्रायणी नदी वरील पुलाची देखभाल दुरुस्ती दरम्यान पर्यायी व्यवस्था, शक्य असल्यास संरक्षण विभागाचे माध्यमातून तात्पुरता पुल विकसित करणे, आळंदी शहरात नगरप्रदक्षिणा मार्ग प्रायोगिक तत्वावर एएकेरी वाहतूक, आळंदीतून अवजड वाहनाना प्रवेश बंदी, अर्धवट चिंबळी केळगाव येथील पुलाचे काम, गोपाळपुरातील पूल जोडणारा अर्धवट रस्ते विकास काम पूर्ण करणे, आळंदी इंद्रायणी नदीला लगतचा शिव रस्ता प्राधान्याने विकसित करणे, मरकळ रस्ता ते के.के. रुग्णालय येथून पुढे वडगाव रस्ता विकसित करणे, पार्किग ची व्यवस्था करणे, गर्दीचे वर्दळीचे ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसलेली मंगल कार्यालये बंद करण्या बाबत या बैठकीत चर्चाच करण्यात आली. रस्ते विकासात अडथळा करणाऱ्यावर नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ते विकसित करण्यास देखील चर्चा झाली. परिसरातील कंपन्यांनी शक्य असेल तर रस्त्यांचे खड्डे भरण्यास सामाजिक उत्तर दायित्व निधी उपलब्ध करून देऊन आळंदी मरकळ रस्ता खड्डे मुक्त करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन उत्तम गोगावले यांनी केले.
या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील म्हणाले, सद्या पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पुलाला जोडणारे रस्ते विकासाचे काम पुणे महानगर नियोजन विकास ( PMRDA ) प्राधिकरणाचे माध्यमातून होणे आवश्यक आहे. ४५ मीटर रस्ता रुंदीकरणाचा आळंदी बाह्यवळण मार्ग हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला आहे. रुंदीकरणा प्रमाणे पूर्ण रस्ता विकसित करण्याची मागणी चऱ्होली ग्रामस्थ यांनी केली आहे.
यावेळी आळंदी नगरपरिषद, आळंदी - दिघी पोलीस स्टेशन, दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखा, पोलीस पाटील, सरपंच, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी, नागरिक, शांतता कमेटी पदाधिकारी यांनी वाहन चालकांनी पर्यायी मार्ग वापरण्यासाठीचे जनजागृती, वाहतुक साक्षरता करण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
.jpeg)
Post a Comment
0 Comments