Type Here to Get Search Results !

आळंदी नगरपरिषद प्रशासन मतमोजणी प्रक्रियेस सज्ज

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन  


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष आणि सदस्य निवडीसाठी झालेल्या निवडणुकीतील मत मोजणीचे प्रक्रियेसाठी आळंदी नगरपरिषद निवडणूक विभागावासह प्रशासन सज्ज झाले असून शहरात प्रभावी शांतात सुव्यवस्था कायम रहावी यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २ डिसेम्बर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी ( दि. २१ ) रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी १० वाजल्या पासून सुरू होणार आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी माहिती दिली. 

 संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया आळंदी नगरपरिषद टाऊन हॉलचे मुख्य सभागृहात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासकीय यत्रंणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. सर्व उमेदवार यांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली असून मत दान यंत्र ( EVM मशीन ) स्ट्रॉंग रूम मध्ये असून सकाळी आठ वाजता उमेदवार / प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे. प्रशासनाने निवडणूक मत मोजणी प्रक्रियेसाठी ३८ अधिकारी आणि १५ कर्मचारी नियुक्ती केले आहेत. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना या संबंधित कामकाजाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी कळविले आहे. 

 आळंदीतील मतमोजणीचे ठिकानी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात रहाणार आहे. नगरपरिषद कार्यालयाचे सभागृहात प्रत्येक्ष दहा वाजता मतमोजणी सुरु होईल. संपूर्ण प्रभाग क्रमांक १ ते १० आणि नगराध्यक्ष पदाचा निकाल पूर्ण होई पर्यंत कामकाज प्रक्रिया सुरु रहाणार आहे. सुरक्षा व्यवस्था मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी ठिकाणी अधिकृत पास धारकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचारी असे ५३ जणांचे मनुष्यबळ (३८ अधिकारी व १५ कर्मचारी) नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, मतमोजणी केंद्राच्या परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना आणि उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधींना निवडणूक आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी केले आहे. 

    आळंदीत शांतता कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे अंकित आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे माध्यमातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. १८ दिवसांचे प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी ( दि. २१ ) मतमोजणी नंतर निकाल जाहीर होत आहे. आळंदीत प्रभाग क्रमांक १ ते १० मधून २१ सदस्य आणि एक नगराध्यक्ष पदासाठी मतदान २ डिसेम्बर २०२५ रोजी शांततेत पार पडले. यासाठी आळंदी नगरपरिषद, महसूल, पोलीस प्रशासनाने यशस्वी कामकाज परिश्रम पूर्वक केले.         

Post a Comment

0 Comments