इंद्रायणी नदी काठावर आरती उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पुत्रता भागवत एकादशी निमित्त माऊलींचे संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत भागवत एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली.
श्रींचे संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. परंपरेने श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला. देवस्थान तर्फे भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदी परिसरात श्रींचे दर्शना निमित्त भाविकांची गर्दी होती. इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी गर्दी करून आचमन केले. स्थान महात्म्य जोपासत इंद्रायणी नदीचे दर्शन, पूजन करीत दीप दान दिले. भाविकांनी हरिनाम गजरात मंदिर आणि नगरप्रदक्षिणा केली. नदी घाटावर भाविकांची दिवसभर वर्दळ आणि भक्तिमय वातावरण होते.
इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर नित्य नैमित्तिक एकादशी निमित्त इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली. या वेळी संयोजक अनिता झुजम, अर्जुन मेदनकर, दिलीप महाराज ठाकरे, महिला बचत गट महासंघ अध्यक्ष सुवर्णा काळे, छाया देवरे, रेणुका शेजुळ, मयुरी मनाडे, शोभाताई धोंडसे, शैलाताई तापकीर, कौसल्या देवरे, पुष्पाताई लेंडघर, नीलम ताई कुरधोंडकर, शारदा सोळुंके, शोभा कुलकर्णी, सावित्रीबाई घुंडरे, विमल मुसळे, सुरेखा काळभोर, जयश्री भागवत, विद्या आढाव, काशीबाई आडीकणे, सुनिता हिळे, अलका पतंगे, उषा पाटील, सृष्टी हिल्ली, राधिका आडकीने, वर्षा खिल्लारी, मीरा कांबळे, अनिता शिंदे, सुमन व्यवहारे, आशा शिंदे, शिराबाई कदम, सुरेखा कुऱ्हाडे, द्वारका घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने नागरिक, भाविकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. पसायदान उपक्रमाचे सांगता झाली.




Post a Comment
0 Comments